इर्री येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST2021-07-26T04:26:48+5:302021-07-26T04:26:48+5:30

गोंदिया : तालुक्यातील ग्राम इर्री येथे शेतीच्या कारणातून झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकणात दोन गटांतील चौघांवर ...

Fighting between two groups at Irri | इर्री येथे दोन गटांत हाणामारी

इर्री येथे दोन गटांत हाणामारी

गोंदिया : तालुक्यातील ग्राम इर्री येथे शेतीच्या कारणातून झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकणात दोन गटांतील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान घडली.

पऱ्हा लावण्याच्या कारणावरून भीमराज लहू मेंढे (५२) यांना दोन आरोपींनी कुऱ्हाडीने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. भागेश्वर भीमराज मेंढे (३०) हे भांडण सोडविण्याकरिता गेले असता त्यांनाही काठीने मारून जखमी केले. दोन्ही आरोपीविरुध्द गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३२६,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तर सोहनलाल अनंतराम मेंढे (२८) यांनी दिलेल्या तक्रारीनिसार, अनिरुद अनंतराम मेंढे (४०) यांना आरोपींनी जागा आमची आहे असे बोलून कुऱ्हाड व फावड्याने मारले. मदतीसाठी सोहनलाल मेंढे (२८) आले असता त्यांनाही धक्काबुक्की करून जमिनीवर आपटले. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३२६,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक तिवारी करीत आहेत.

Web Title: Fighting between two groups at Irri