शेतकरी-शेतमजुरांच्या हितासाठी राकाँची लढाई
By Admin | Updated: March 18, 2016 02:11 IST2016-03-18T02:11:30+5:302016-03-18T02:11:30+5:30
अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीॅची सभा जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे व किसान सभेचे जिल्हा समन्वयक ...

शेतकरी-शेतमजुरांच्या हितासाठी राकाँची लढाई
नवेगावबांधला बैठक : उच्च न्यायालयातील याचिकेला पूर्ण समर्थन
अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीॅची सभा जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे व किसान सभेचे जिल्हा समन्वयक मनोहर चंद्रीकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात घेण्यात आली. यावेळी शेतकरी-शेतमजुरांच्या हितासाठी राष्ट्रवादीची लढाई सुरूच राहील, असा निश्चय व्यक्त करण्यात आला.
पक्षाच्या किसान सभा विभागाचे प्रमुख शंकरअण्णा धाडगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या समर्थनात जास्तीत-जास्त शेतकऱ्यांकडून अर्ज उच्च न्यायालयाला पाठविण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला.
अर्जामध्ये घेतलेले शेतकरी-शेतमजुरांच्या हिताचे सर्व मुद्दे व मागण्या शासन मान्य करीत नाही म्हणून न्याय पालिकेच्या माध्यमातून त्या पूर्ण होण्यासाठी ही याचिका भविष्यात कारणीभूत ठरणार असा विश्वास या सभेच्या माध्यमातून करण्यात आला.
सभेला तालुकाध्यक्ष नामदेव डोंगरवार, युवक जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण (बंडू) भेंडारकर, उध्दव मेहेंदळे, मानिक कापगते, अजय पाऊलझगडे, संजय राऊत, दीपक सोनवाने, अनिल लाडे, शालीक हातझाडे, मनोहर शहारे, यदवराव तरोणे, नामदेव कापगते, मोरेश्वर खंडाईत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)