पटेलांचा ५ जूनला गोंदियात सत्कार

By Admin | Updated: June 3, 2016 01:43 IST2016-06-03T01:43:44+5:302016-06-03T01:43:44+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत अविरोध निवड झाली. त्यांच्या गोंदिया आगमनावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Felicitated on 5th June in Gondiya | पटेलांचा ५ जूनला गोंदियात सत्कार

पटेलांचा ५ जूनला गोंदियात सत्कार

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत अविरोध निवड झाली. त्यांच्या गोंदिया आगमनावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच पक्षाच्या सर्व संघटनांकडून रविवारी ५ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता एनएमडी कॉलेजच्या आॅडोटोरियममध्ये सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बंसोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, महेश जैन, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, रमेश ताराम, अजय गौर, उषा किंदरले, पंचम बिसेन, चुन्नी बेंदरे, डॉ. अविनाश काशिवार, ममता बैस, डॉ. किशोर पारधी, सुमन बिसेन, रीता लांजेवार, राजकुमारी विश्वकर्मा, रमेश गौतम उपस्थित रहातील.
सत्कार समारंभात पक्षाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत व सहकार क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, बबलू कटरे, केतन तुरकर, शिव शर्मा, कुंदन कटारे, जिब्राईल पठान, बालकृष्ण पटले, आशा पाटील, नामदेव डोंगरवार, कमलबापू बहेकार, प्रेम रहांगडाले, केवल बघेले, प्रभाकर दोनोडे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated on 5th June in Gondiya