राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST2021-07-03T04:19:18+5:302021-07-03T04:19:18+5:30

गोंदिया : राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी ...

Fees will be reduced for all the universities in the state | राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार

राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार

गोंदिया : राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे लाऊन धरली होती. अखेर भाजयुमोच्या मागणीला यश आले असून उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करण्याची घोषणा केली आहे.

या मागणीसाठी भाजयुमोने राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करीत निषेध व्यक्त केला होता. याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा याकरिता भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपालांची भेट घेऊन मागणी केली होती. नागपूर विद्यापीठातही संघर्षाची भूमिका घेत भाजयुमोने यशस्वी आंदोलन करीत शुल्कात सूट मिळवून घेतली होती. त्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी अशी शुल्क कपात करावी, अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे, सन २०२०-२१ साठीही हा निर्णय लागू करावा आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांना सुद्धा हा निर्णय लागू करावा या मुख्य मागण्यांवर ही त्वरित सकारात्मक निर्णय करावा, अशी मागणी कटरे यांनी केली आहे.

Web Title: Fees will be reduced for all the universities in the state