शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

फेडरेशनचे चार लाख क्विंटल धान उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा हमीभाव अधिक असल्याने या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत एकूण ३४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे वेळकाढू धोरण : तांदळाची उचल संथगतीने, नुकसानीचा आकडा लपविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात पडून असलेल्या मागील वर्षीच्या तांदळाची उचल अद्यापही संथगतीने सुरू असल्याने भरडाईसाठी १३ लाख क्विंटल धान प्रतीक्षेत आहेत. तर खरेदी केलेला चार लाख क्विंटल धान अद्यापही केंद्रावर उघड्यावर पडून आहे. या धानाला २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. मात्र यानंतरही जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा हमीभाव अधिक असल्याने या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत एकूण ३४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.आदिवासी विकास महामंडळाचे धान ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था न करण्यात आल्याने हा धान तसाच ४४ केंद्रावर ताडपत्र्या झाकून ठेवण्यात आला आहे. या विभागाचे सुध्दा दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होऊनही त्यांनीही यावर उपाय योजना केली नाही. परिणामी धानाची चोरी आणि नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.यंदा हीच वेळ जिल्हा मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे. फेडरेशनने आत्तापर्यंत २४ लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. यापैकी १३ लाख क्विंटल धान भरडाईसाठी करार केलेल्या २८६ राईस मिलर्सकडे पाठविण्यात आला आहे. तर फेडरेशनकडे केवळ ८ लाख क्विंटल धान साठवून ठेवण्यासाठी गोदामे उपलब्ध आहे.मात्र यंदा एफसीआयच्या गोदामांमध्ये मागील वर्षीचा ६० हजार मेट्रीक टन तांदूळ पडून होता.यापैकी आतापर्यंत केवळ २० हजार मेट्रीक टन तांदळाची उचल करण्यात आली. तर अद्यापही ४० हजार मेट्रीक टन तांदूळ गोदामात पडून असल्याने नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धान भरडाईच्या प्रतीक्षेत गोदामात आणि जिल्ह्यातील ६६ धान खरेदी केंद्रावर उघड्यावर पडून आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन दिलेल्या माहितीनुसार उघड्यावर जवळपास चार लाख क्विंटल धान मागील पंधरा दिवसांपासून पडला आहे.मागील दहा दिवसांपासून भरडाईसाठी धानाची उचल करण्याची प्रक्रिया फारच संथगतीने सुरू असल्याने याचा फटका खरेदी केंद्रावर धान विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.दिंरगाईचा फटका शेतकऱ्यांनाजिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रावर नेले. मात्र केंद्रावर धानाचे काटे होण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे धान केंद्रावर उघड्यावर काटे होण्याचे प्रतीक्षेत पडून आहे. सोमवारी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे धान भिजल्याने त्यांना कोंब फुटली. आता हे धान खरेदी करण्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून नकार दिला जात आहे. तर जोपर्यंत धानाचा काटा होत नाही तोपर्यंत धानाचे संरक्षण करण्याची जवाबदारी ही शेतकऱ्यांची असते. नेमक्या या अटीचा फायदा केंद्र चालक घेत आहे. मात्र यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड