नियुक्ती देण्यासाठी उमेदवारांचे उपोषण

By Admin | Updated: July 26, 2016 01:34 IST2016-07-26T01:34:35+5:302016-07-26T01:34:35+5:30

राज्य शासनाच्या आदेशाने गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली आरोग्य सेविकांची ३७ पदे भरण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१५ ला परीक्षा घेण्यात आली.

Fearing candidates for appointment | नियुक्ती देण्यासाठी उमेदवारांचे उपोषण

नियुक्ती देण्यासाठी उमेदवारांचे उपोषण

नऊ महिन्यांपूर्वी घेतली परीक्षा : १०१३ उमेदवारांचा जीव टांगणीला
गोंदिया : राज्य शासनाच्या आदेशाने गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रात रिक्त असलेली आरोग्य सेविकांची ३७ पदे भरण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१५ ला परीक्षा घेण्यात आली. मात्र नऊ महिने लोटले तरी ही या भरतीची पुढील प्रक्रिया केली जात नसल्यामुळे परीक्षा देणाऱ्या १०१३ उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यापैकी १० उमेदवार महिला सोमवारपासून जि.प. समोर बेमुदत उपोषणावर बसल्या आहेत.
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत गणल्या जात असल्याने या विभागाची सेवा जास्तीत जास्त चांगली राहावे यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.
सदर आरोग्य सेविकांच्या पदभरतीला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आव्हाण दिले होते. त्यानंतर न्यायालयाने राज्यभरात या पदभरतीला स्थगीती दिली होती. मात्र रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित होऊ नये म्हणून काही जिल्ह्यांनी ही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित निकालाच्या अधीन राहून उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. उमेदवारांनीही न्यायालयाचा निकाल मान्य राहील असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले. िभंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या सर्वच जिल्ह्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण करून आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र गोंदियातच ही प्रक्रिया केली नाही. त्यामुळे्न नियुक्तीच्या आशेने नजर लावून बसलेल्या हजारावर बेरोजगार युवती करीत आहेत.
सरळ सेवा भरतीअंतर्गत २५ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल ३० नोव्हेंबरलाच लावला होता. मात्र प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी न लावता सरसकट सर्वांचे गुण असणारी यादी लावण्यात आली. त्यामुळे नेमका कुणाचा नंबर लागू शकतो याचाही अंदाज घेणे शक्य होत नसल्यामुळे उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या चकरा मारीत थकलेल्या उमेदवारांनी आज सोमवारपासून जि.प. समोर उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणावर सपना मेश्राम, पुष्पा कटरे, मनिमाला विश्वास, अनिता सोनवाने, प्रतिमा रामटेके, लता कापसे, दीपमाला उंदीरवाडे, भूमाली उईके, अर्चना बोरकर, जयश्री केंद्रे, वर्षा गेडाम, गंगा चव्हाण, सुंदरा भगत, उषा मेंढे ह्या उमेदवार बसल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली भेट
आरोग्य सेविका म्हणून नियुक्ती देण्यात यावी या मागणीला घेऊन जि.प. समोर उपोषण सुरू केलेल्या उमेदवारांच्या मंडपाला पहिल्याच दिवशी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी भेट दिली. फाईल जिल्हाधिकारी यांच्या दालनात आहे. २८ ताखेला त्यावर सभा होणार आहे. त्याच्यानंतरच त्यावर निर्णय होऊ शकेल असे त्यांनी त्या उपोषणकर्त्या उमेदवारांना सांगितले. यावेळी प्रहारचे प्रमोद गजभिये उपस्थित होते.

Web Title: Fearing candidates for appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.