गोंदियातील रस्त्यावर जीवघेणे खड्डे

By Admin | Updated: November 22, 2014 00:39 IST2014-11-22T00:39:16+5:302014-11-22T00:39:16+5:30

शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेले गटार लाईनचे खड्डे अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहेत.

Fatal pitches on the Gondiya road | गोंदियातील रस्त्यावर जीवघेणे खड्डे

गोंदियातील रस्त्यावर जीवघेणे खड्डे

गोंदिया : शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेले गटार लाईनचे खड्डे अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात घडतात. मात्र पालिकेच्या बांधकाम विभागाला अजूनही जाग आलेली नाही. अनेक वेळा याबाबत पालिकेला कळविल्यानंतरही या खड्ड्यांवर साधे झाकण लावण्याचे सौजन्य दाखविल्या जात नसल्यामुळे न.प.प्रशासनाची आपल्या यंत्रणेवरील पकड किती सुटली याची कल्पना येत आहे.
रस्त्यांच्या मधातून जात असलेल्या नाल्यांची सफाई करण्यासाठी मधोमध खड्डे (आऊटलेट) बनविण्यात आले आहेत. मात्र सफाईचे काम झाल्यानंतर त्यावर झाकण लावण्याचे औचित्य मात्र दाखविले जात नाही. त्यामुळे पालिका प्रशासन या खड्ड्यात एखाद्या वाहनधारकाने पडून त्याचा बळी जावा किंवा मोठा अपघात व्हावा याची तर वाट बघत नाही ना, असा सवाल आता शहरवासीय करू लागले आहेत.
उघड्यावर पडून असलेल्या या खड्ड्यांमुळे दिवसा तर नाही, मात्र रात्रीला कित्येकदा लहान-सहान अपघात घडतात. कित्येक जणं वाहनासह या खड्ड्यांत पडून जखमी झाल्याचेही ऐकीवात आहे. हे सर्व प्रकार घडत असतानाही पालिकेच्या बांधकाम विभागाचे याकडे सपशेल दुर्लक्ष दिसून येते. विशेष म्हणजे त्या खड्ड्यांचे झाकणही बाजुलाच पडून असते. त्यामुळे वाहनधारकांना तो खड्डा आणि त्याचे झाकण अशा दोन्हीपासून बचाव करीत कसरत करावी लागते. ज्या खड्ड्यांचे झाकणच नाही त्यांच्यासाठी झाकण बनवून ते खड्डे बंद पाडण्याची गरज आहे. मात्र नगर पालिकेला मलाईदार कामातूनच वेळ काढून नागरिकांच्या जीविताशी संबंधित अशा कामांकडे लक्ष देण्याची गरजच वाटत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fatal pitches on the Gondiya road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.