कापसाच्या अत्यल्प दरामुळे शेतकरी चिंतेत
By Admin | Updated: November 17, 2014 22:58 IST2014-11-17T22:58:48+5:302014-11-17T22:58:48+5:30
निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने कापसाला सात हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली होती. मात्र आता जुन्या कापसाला ३,५०० तर नवीन

कापसाच्या अत्यल्प दरामुळे शेतकरी चिंतेत
वाढोणा : निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने कापसाला सात हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली होती. मात्र आता जुन्या कापसाला ३,५०० तर नवीन कापसाला ३,८०० रुपये भाव देण्यात येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात तरी शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
या वर्षी पाऊसच वेळेवर न आल्यामुळे तब्बल दीड महिना उशिरा कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा घरात अद्यापही कापूस आला नाही. त्यातच पावसाचा अनियमितपणा सुरू असून कपाशीचे पीक भरघोस होण्याची शेतकऱ्यांना कुठलीच आशा नाही. मुगाचे पीक पूर्णत: हातचे गेले. कपाशीचे पीक पाहिजे तसे नाही. त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. त्याचत जुन्या कापसाला केवळ ३५०० व नवीन कापसाला ३८०० रुपये क्विंटलचा भाव असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपा युतीने कापसला ७ हजार रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना भरघोस मतदान करून निवडून दिले मात्र हा भाव आता मिळणार की केवळ घोषणाच राहणार, असा चिंतेचा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.(वार्ताहर)