शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मका फेकला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानपिक घेतले जाते. पीक बदल व नगदी पिकाकडे शेतकºयांनी वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी मका लागवडीचा प्रयोग केला. बोंडगाव सुरबन, केशोरी, महागाव, पांढरवाणी, परसोडी या परिसरात मका लागवड झाली. पीक निघाले मात्र शासनाचे आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरूच झाले नाही.

ठळक मुद्देआंदोलन मागे : अखेर नवेगावबांध येथे मका खरेदी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोदाम भरल्याने बंद पडलेली मका खरेदी शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर बुधवारपासून (दि.१७) पुन्हा सुरू करण्यात आली. बुधवारी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका नवेगावबांधच्या आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर आणून रस्त्यावर फेकला. दरम्यान वाटाघाटीनंतर प्रकरण निवळले.अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानपिक घेतले जाते. पीक बदल व नगदी पिकाकडे शेतकºयांनी वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी मका लागवडीचा प्रयोग केला. बोंडगाव सुरबन, केशोरी, महागाव, पांढरवाणी, परसोडी या परिसरात मका लागवड झाली. पीक निघाले मात्र शासनाचे आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरूच झाले नाही. आर्थिक चणचण असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी कमी दराने व्यापाऱ्यांना मका विकला. तर काही शेतकऱ्यांनी राजकीय बळाचा वापर केला. खा. प्रफुल्ल पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे दाद मागून शेतकºयांचा मका खरेदी करण्यास भाग पाडले होते. आदिवासी विकास महामंडळामार्फत केशोरी व गोठणगाव येथे खरेदी केंद्र सुरू झाले. अल्पावधीतच गोदाम भरल्याने खरेदी बंद पडली. बऱ्याच शेतकऱ्यांचा मका खरेदी केंद्रावर तर काहींचा घरातच पडून राहिला. पांढरवाणी, परसोडी परिसरातील शेतकऱ्यांना गोठणगाव, केशोरी केंद्रावर मका नेऊन विक्री करणे वाहतुकीच्या दृष्टीने परवडण्यासारखे नव्हते. शिवाय आधीच गोदाम खच्च भरलेले होते. त्यामुळे मका खरेदी बंद होती व शेतकऱ्यांजवळ मका पडून होता. १७ जूनपर्यंत महामंडळाने मका खरेदी न केल्यास पांढरवाणी, परसोडी परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका नवेगावबांधच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर आणून टाकण्याचा इशारा दिला होता. बुधवारी सकाळी शेतकरी ट्रॅक्टरमध्ये मका घेऊन नवेगावबांध येथे एकत्र आले. त्यांनी मका रस्त्यावर घातला. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, यशवंत गणवीर, अनिल दहीवले, शिवाजी गहाणे, पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे यांनी मध्यस्थी केली.उपप्रादेशिक व्यवस्थापक राहुल पाटील यांनी गोदाम भाड्याने घेऊन नवेगावबांध येथील शासकीय गोदामात मका खरेदी करण्यास संमती दिली. त्यानंतर हे प्रकरण निवळले. मात्र पांढरवाणी, परसोडी भागातील शेतकऱ्यांचे धान घेतले जात नसल्याची ओरड सुरू आहे. गोदाम रिकामे नसल्याचे कारण सांगितले जात असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप