बारदान्याचा फटका शेतकऱ्यांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:06 IST2017-12-17T00:06:26+5:302017-12-17T00:06:47+5:30
शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उघडले आहेत. मात्र तालुक्यातील १० केंद्रांवर बारदाना नसल्यामुळे धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे.

बारदान्याचा फटका शेतकऱ्यांच्या माथी
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उघडले आहेत. मात्र तालुक्यातील १० केंद्रांवर बारदाना नसल्यामुळे धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे. यामुळे बारदान्याचा फटका शेतकऱ्यांच्या माथी बसत आहे.
तालुक्यातील परसोडी, डव्वा, खजरी, कनेरी, चिखली, डोंगरगाव-डेपो, कोयलारी, दल्ली, सडक-अर्जुनी व कोहमारा या १० केंद्रांतील आदिवासी सेवा सहकारी संस्थांमध्ये गेल्या २० दिवसांपासून बारदाना नाही. अशात केंद्रांवर धान विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे. अशात बारदाना मात्र शेतकºयांना द्यावा लागत असल्याने त्यांना परवडत नाही.
परिणामी तालुक्यातील गरीब शेतकºयांना आता व्यापाºयांना पडक्या भावात धान विकावा लागत आहे. यावर्षी धानाचे उत्पादन चांगले नाही. किड व रोगांच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बहुतेक शेतकऱ्यांची शेती पडीक राहीली. आता आदिवासी महामंडळ शेतकºयांना बारदाना वेळेवर उपलब्ध न करून पुन्हा शेतकऱ्यांचे हाल करीत आहे. तरी जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देवून बारदाना लवकर उपलब्ध करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे किसान सभा महासचिव एफ.आर.टी.शहा यांनी केली आहे.