निमगाव सोसायटीत शेतकरी पॅनलचे वर्चस्व

By Admin | Updated: March 29, 2015 01:39 IST2015-03-29T01:39:44+5:302015-03-29T01:39:44+5:30

जवळच असलेल्या निमगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चुरशीच्या ...

Farmers panel dominance in Nimgaon society | निमगाव सोसायटीत शेतकरी पॅनलचे वर्चस्व

निमगाव सोसायटीत शेतकरी पॅनलचे वर्चस्व

बोंडगावदेवी : जवळच असलेल्या निमगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चुरशीच्या निवडणुकीत विलास गायकवाडा यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलने परिवर्तन पॅनलवर मात करुन आपले वर्चस्व यावेळीसुद्धा अबाधित ठेवण्यात यश मिळविले.
निमगाव-बोंडगावदेवी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १३ कार्यकारी मंडळाची निवड करण्यासाठी दि.२४ रोजी निवडणुक घेण्यात आली. गावपाळीवरील सहकार क्षेत्रातील संस्थेच्या निवडणुकीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल तर अंताराम तसेच रतीराम कापगते यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल सर्वशक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. दोन्ही पॅनलने सदर निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गावच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत गावातील अनुदानप्राप्त एका खासगी शाळेचे मुख्याध्यापक असलेले राधेश्याम कापगते यांच्या शाळेमध्ये परिचर म्हणून कार्यरत असलेल्या अहिल्या राधेश्याम कापगते यांची महिला राखीव गटामधून उमेदवारी असल्याने निवडणुकीकडे गावासह परिसरातील राजकारण्यांचे लक्ष केंद्रित झाले होते.
संस्थेच्या मतदारांना आपल्या बाजुने करण्यासाठी दोन्ही पॅनलच्यावतीने कोणतीही कसर ठेवल्या गेली नाही. मतदानाच्या दिवसापर्यंत गावात राजकीय वातावरण तापले दिसत होते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विलास गायकवाड यांनी मागील पाच वर्षात संस्थेच्या प्रगतीची जाण ठेवून मतदारांनी दुसऱ्यांदा विलास गायकवाड यांच्या गळ्यामध्ये विजयपथाची माळ टाकली. त्यांच्या शेतकरी पॅनलचे विलास गायकवाड, गिरिधारी बाळबुद्धे, बळीराम बाळबुद्धे, भास्कर बांबोले, अर्जुन येसनसुरे, निवृत्ती हुकरे, प्रभुदास खोब्रागडे, लिलाधर निमजे, मंदाबाई पुस्तोडे, रतीराम कापगते यांच्या परिवर्तन पॅनलचे रतीराम कापगते, चंद्रशेखर गोबाडे, गोसाई पुस्तोडे, अहिल्या कापगते विजयी झाले.
गायकवाड यांनी नऊ जागांवर विजयी मिळवून दुसऱ्यांदा आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले, तर रतीराम कापगते यांच्या परिवर्तन पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. खासगी शाळेत परिचर म्हणून कार्यरत असलेल्या संस्थापक मुख्याध्यापकाची पत्नी अहल्या कापगते थोड्याफार फरकाच्या मताने विजयी झाला. गायकवाड यांनी १३ पैकी ९ जागांवर विजय मिळवून आपले अस्तित्व कायम ठेवले. (वार्ताहर)

Web Title: Farmers panel dominance in Nimgaon society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.