तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:29 IST2017-09-06T00:29:18+5:302017-09-06T00:29:49+5:30

सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते.

Farmers, Farmers' Front at Tehsil Office | तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

तहसील कार्यालयावर शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन : मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : सन १९३६ मध्ये देशात पहिल्यांदा शेतकºयांची संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा १ सप्टेंबर हा मागणी दिवस म्हणून साजरा करते. या निमित्ताने बस स्थानकावरुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव व मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
केंद्रात व राज्यात विद्यमान सरकार आल्यापासून कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात कमी होण्याऐवजी वाढच झाली आहे. दिवसागणिक ती वाढ होत आहे. हा प्रकार आता धान पट्यातही पोहोचला आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून शेतकºयांची सरसकट कर्जमाफी ही आहे.
मात्र फडणवीस सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी सिध्द होत अहे. तेव्हा सरसकट कर्जमाफी देऊन शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात यावा. केंद्र व राज्य सरकारच्या प्रमुखांनी निवडणुकीत घसा कोरडा होईपर्यंत डरकाळ््या फोडून स्वामीनाथन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. पण आता केंद्र सरकारने यावर असमर्थता दर्शविली आहे. देशातील शेतकºयांची ही फसवणूक दूर करण्यात यावी व तात्काळ स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा. वनाधिकारी कायदा २००५ मधील इतर पारंपरीक वननिवासी तथा गैरआदिवासींकरिता असलेली तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी. वनाधिकार कायद्याखाली दावे सादर करणाºयांचे दावे प्रक्रिया प्रकरणात दावेदारांना काहीच माहिती दिली जात नाही. तेव्हा त्यांना याबद्दल संधी देण्यात यावी. जिल्हा वनहक्क समितीने दावा फेटाळल्यास त्यांना राज्य सनियंत्रण समितीकडे दाद मागण्यांची सोय करुन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.गोंदिया, मुंडीपार ता.सडक-अर्जुनी येथील किसान ग्रामपंचायत व नागरिकांनी केलेल्या मागणीप्रमाणे त्या गावातील तलावाची खासगी मालकी असलेली नोंद रद्द करुन ती सार्वजनिक तलाव अशी नोंद करण्यात यावी. तलावाचे नियंत्रण अधिकार संबंधित ग्रामपंचायत किंवा शासकीय एजेन्सीला देण्यात यावे, या मागणीचा सुद्धा निवेदनात समावेश आहे.सदर मोर्चात मिलिंद गणवीर, अशोक मेश्राम, ललित वैद्य, जोमा बावणकर, उध्दव कडुकार, दमयंता वासनिक, धनलाल रंगारी, नाजुकराव मेश्राम, मूलचंद बंसोड आदीउपस्थित होते.

Web Title: Farmers, Farmers' Front at Tehsil Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.