शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक नोंदणीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:48 IST

Gondia : ई-पीक पाहणी करण्यासाठी अँपवर येत आहे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अद्यापही ई-पीक नोंदणीपासून वंचित असून, यामुळे त्यांची धान खरेदीसाठी आवश्यक असलेली अधिकृत नोंदणी पूर्ण झालेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात ई-पीक नोंदणीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ई-पीक पाहणी अॅपने अनेकवेळा काम करणे बंद केले होते. तसेच सातबारा उतारा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नोंदणी करण्यास अडथळे आले. याशिवाय ऑनलाईन पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळेही नोंदणी रखडली. परिणामी, २९ जूनपर्यंत वाढविलेली अंतिम मुदत संपल्यानंतरही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. काही शेतकऱ्यांना १ जुलै रोजी सातबारा मिळाला, तेव्हा १५ जून ही नोंदणीची अंतिम तारीख कशी काय गाठता येईल? हा मोठा विरोधाभास असून, शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत धान खरेदीची अंतिम मुदत २० जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. म्हणूनच शेतकरी ई-पीक नोंदणीसाठीही हीच मुदत लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून धान खरेदी ठप्प झाली आहे. याशिवाय बीईएएम ऑनलाईन पोर्टलवर सतत येणाऱ्या अडचणींमुळे खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. सरकारने दिलेल्या मुदतीत सर्व पात्र शेतकऱ्यांची धान खरेदी न झाल्याने असंतोष वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर, ई-पीक नोंदणीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेतीFarmerशेतकरी