शेतकरी पाण्यासाठी आसूसलेले

By Admin | Updated: February 11, 2016 02:13 IST2016-02-11T02:13:49+5:302016-02-11T02:13:49+5:30

उदरनिर्वाहासाठी शेती गरजेची आहे. शेतीच्या पिकांवर नागरिक, राज्य आणि प्रशासनसुध्दा ७० टक्के अवलंबून आहे.

Farmers are interested in water | शेतकरी पाण्यासाठी आसूसलेले

शेतकरी पाण्यासाठी आसूसलेले

निकृष्ट व अर्धवट बांधकाम : कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे संगनमत
बाराभाटी : उदरनिर्वाहासाठी शेती गरजेची आहे. शेतीच्या पिकांवर नागरिक, राज्य आणि प्रशासनसुध्दा ७० टक्के अवलंबून आहे. पण जिल्हा पाण्याचा असूनही इथल्या शेती पोशिंद्याला पीक घेण्यासाठी कालव्यालगतच्या शेतीलाही पाणी मिळत नाही. पण याच कालव्यांना नटवण्यासाठी प्रशासन आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खासगी कंत्राटदाराकडून ओबळधोबळ काम करवून घेतात. या कामांना आता वेग येत आहे, पण शेतकऱ्यांना मात्र पाण्याअभावी खेद होत आहे.
परिसरात २०१५ ला उन्हाळ्यामध्ये नवेगावबांध तलावाच्या पाण्याचे स्त्रोत, लहान-मोठा कालवा शेती पाण्यासाठी उपलब्ध आहेत. पण हे कालवे निकामी ठरल्यासारखे आहेत. फक्त त्यांना नववधूप्रमाणे नटविले जाते. सिंमेटचे बासिंग बांधून निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. पण या परिसराचा शेतकरी मात्र पाण्यासाठी आसूसलेलाच दिसतो.
काम जरी झाले तरी ते निकृष्ट व अर्धवटच असते. याची तपासणी कधीच झाली नाही. कंत्राटदार व सदर विभागाचे अभियंता-कर्मचारी आणि अधिकारी यांचे ओल्या पार्टीचे संगनमत व पाकीट बंदचा प्रकार असतो. लिफाफा ही तत्त्वप्रणाली सुरूच आहे.
या कालव्यालगत शेती परिसरात कधीच पूर्णपणे पाणी मिळाले नाही. उन्हाळी हंगाम तर कधीच पूर्ण झाले नाही. नवेगावबांधचे पाणी कालवा मार्गाने कधीच पूर्ण मिळत नाही. त्यामुळे मोठा शेतकरी हा स्वत:च्या शेतात बोअरवेल करतो. मात्र अभियंता-अधिकारी यांची चौकशी नाही. सदैव दुर्लक्ष म्हणून पावसाळी-उन्हाळी शेती पिके अनेकवेळा हातून गेले. अशातच कर्जाचे ओफे व धान नाही म्हणून आत्महत्येचा प्रकार घडतो.
पाण्याची आवश्यकता आहे पण मिळत नाही. कमिशन तत्वावर खासगी व शासकीय कंत्राटदारांना काम देऊन मोकळे होतात. पण त्या कालव्यांमध्ये पाण्याचा थेंबही दिसत नाही, असेच सर्वत्र दिसून येते. सिमेंट कामासारखे इतर काम झाले, पण त्याला कधी योग्य न्याय मिळत नाही. कुठे काम तुटतो, कधी पाईप टाकत नाही, बंधारा देत नाही. पाणी योग्य मिळत नाही, पण कामाला मात्र मर्यादा नाहीच.
अशा परिस्थितीमध्ये कोणतीही शेती पिकत नाही. त्यामुळे नुकसानच सहन करावे लागते. भूमिपूत्र, मंत्री, आमदार, खासदार लक्ष देत नाही. येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, बोळदे, कवठा, सुकळी, खैरी, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी, डोंगरगाव येथील शेतकरी उन्हाळी पिकाची आस करतात. पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी कामे सुरळीत होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmers are interested in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.