शेतकºयांना दुसरे खाते उघडण्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:54 IST2017-08-29T23:53:45+5:302017-08-29T23:54:00+5:30
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँकेत आधीच खाते असताना पुन्हा खाते उघडण्यासाठी सक्ती केली जात आहे.

शेतकºयांना दुसरे खाते उघडण्याची सक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँकेत आधीच खाते असताना पुन्हा खाते उघडण्यासाठी सक्ती केली जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त असून सक्ती करणाºया बँकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना नवीन दुसरे खाते उघडण्यासाठी थकीत कर्जदाराला बाध्य केले जात आहे. त्यामुळे गरजेपोटी खाते उघडण्यासाठी बँकेत शेतकºयांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
काही शेतकरी आजारी असल्याने त्यांची अडचण झाली आहे. येथील जिल्हा बँकेच्या शाखेत कर्मचाºयांचा अभाव असल्याने शाखा व्यवस्थापक कामाले लागले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना दुसरे खाते उडण्याची सक्ती केल्याने भीतीपोटी बँकामध्ये शेतकºयांची गर्दी वाढत आहे.
केवायसी भरुन किंवा आधार लींक करुन शेतकºयांची अडचण दूर होऊ शकते. पण बँकेने नवा फंडा आणल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. सहकारी बँक व्यवस्थापक मंडळाने नवीन कर्मचारी बँकेत देऊन शेतकºयांची अडचण दूर करावी. अशी मागणी सेवा सहकारी अध्यक्ष व शेतकºयांनी केली आहे.