धान खरेदी केंद्रावर होतेय शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:01:07+5:30

शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हमालांकडून लुबाडणूक केली जात आहे.

Farmers are being robbed at the paddy shopping center | धान खरेदी केंद्रावर होतेय शेतकऱ्यांची लूट

धान खरेदी केंद्रावर होतेय शेतकऱ्यांची लूट

Next
ठळक मुद्देदिघोरी येथील प्रकार : हमाली दर घेतला जातो दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी मोठी : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर हमालांकडून शेतकºयाचे धान उतरविण्यासाठी लुट केली जात असल्याचा प्रकार सुरु आहे. लाखांदूर खरेदी-विक्री संघ आणि
शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हमालांकडून लुबाडणूक केली जात आहे.
शासनाने प्रतिक्विंटल १५ रुपये हमाली घेण्याचे आदेश दिले असताना दिघोरी केंद्रावर मात्र शेतकऱ्यांकडून ३० रुपये प्रति क्विंटल दराने हमाली घेतली जात आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रार केली असता शेतकºयांंना अश्लिल शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार घडला आहे. जे शेतकरी तक्रार करतात त्यांचा धान हेतुपरस्परपणे उशीरा मोजला जातो. त्यांनाथांबवले जाते.
शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत व दामदुप्पट दराने लुबाडणूक करुन हमाल गैरफायदा घेत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याबाबत खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अरुण गभने यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी याबाबत हमालांना विचारणा करणार असल्याचे सांगितले.

हमालांना १५ रुपये प्रति क्विंटल दर शासनाने ठरवून दिला आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांकडून हमाली घेण्यात यावी, अशी अपेक्षा आहे. जर अधिक दराने शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असेल तर हमाल बदलले जातील.
- अरुण गभने, उपाध्यक्ष
खरेदी-विक्री संघ, दिघोरी/मोठी

Web Title: Farmers are being robbed at the paddy shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार