शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो जनावरांना लम्पीचा पुन्हा धोका; लक्षणे आढळल्यास घ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:07 IST

यंत्रणा अलर्ट: जिल्ह्यात २.९२ लाख जनावरांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : लम्पी हा अतिशय भयंकर आजार आहे. या आजारामुळे जनावरांची तब्येत बिघडते. तसेच या आजाराची लागण इतर जनावरांनाही होत असल्याने इतरही जनावरे या आजाराचे शिकार होतात. या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी पशुवैद्यकीय यंत्रण अलर्ट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मागील महिन्यात सुमारे दोन लाख ९२ हजार जनावरांना लम्पी आजाराची प्रतिबंधात्मक लस दिली आहे.

लम्पी या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू शेळ्ळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. लम्पी त्वचारोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग डास, चावणाऱ्या माशा, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारापाणी यामुळे पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. लम्पी त्वचारोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करणे गरजेचे. 

तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घेतल्यास हा रोग बरा होतो. त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये, यासाठी जखमेवर औषध मलम लावावे. लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुपालकांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. 

हे आहेत उपाय बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, गोचिड, तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावावे.

ही आहेत लम्पीची लक्षणे...जनावराच्या अंगावर १० ते २० मिमी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकटस्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद, दूध उत्पादन कमी, काही जनावरांच्या पायावर सूज येणे व लंगडणे आदी लक्षणे दिसून येतात.

जिल्ह्यात गायवर्ग जनावरे - २.९२ लाख जिल्ह्यात एकूण पशुवैद्यकीय दवाखाने - १०३ जि.प.चे पशुवैद्यकीय दवाखाने - ७२ स्टेटचे पशुवैद्यकीय दवाखाने - ३१ लस पशुसंवर्धन विभागाने केलेले लसीकरण - १,८९,३५८ 

"लम्पी आजारासाठी विशेष असे औषध नाही. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस दिली जाते. ही प्रतिबंधात्मक लस अतिशय परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत गायवर्गीय जनावरांना मोफत लस टोचण्यात आली आहे. लम्पी आजाराची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा." - डॉ. कांतीलाल पटले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगFarmerशेतकरीfarmingशेतीgondiya-acगोंदिया