विद्युतच्या कमी दाबामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त
By Admin | Updated: October 28, 2015 02:11 IST2015-10-28T02:11:39+5:302015-10-28T02:11:39+5:30
विद्युत विभागाद्वारे कमी दाबाचा वीज पुरवठा केल्याने शेतकरी आणि नागरिक त्रासले आहेत. गेल्या एक महिन्याच्या काळात कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे.

विद्युतच्या कमी दाबामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त
काचेवानी : विद्युत विभागाद्वारे कमी दाबाचा वीज पुरवठा केल्याने शेतकरी आणि नागरिक त्रासले आहेत. गेल्या एक महिन्याच्या काळात कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे.
तिरोडा तालुक्यात ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिक कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतातील पिकांना पाण्याचा पुरवठा होत नाही. घरी उद्योगधंद्ये करणाऱ्यांनाही त्रास होत आहे. पीठ दळण्याच्या चाकीसह विविध कामे करण्यात अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थितीत भारी जातीचे धान गर्भाशयात असून या वेळी पाण्याची नितांत गरज आहे.
अशावेळी पाण्याची समस्या निर्माण झाल्यास धानाच्या उत्पन्नात कमालीची घट होणार आहे. विजेच्या कमी दाबामुळे लहान-मोठे व्यावसायिकसुध्दा त्रासले आहेत. (वार्ताहर)
धानावर एकाच वेळी अनेक रोग
शेतकऱ्यांना निसर्ग कधीही सुख-चैनीने जीवन जगू देत नाही, हे सध्या अनुभवले जात आहे. या वेळी शेतकऱ्यांचे हाल झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी पावसाच्या अभावाने पिकांना फटका बसला. परंतु वरूण देवतेच्या कृपेने स्थितीत सुधारणा झाली. मात्र यावेळी धान पिकावर एकाचवेळी अनेक रोग आणि किडीने ग्रासल्याने शेतकऱ्यांचे होश उडाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची औषधी फवारणी केली. मात्र याचा लाभ फारसे झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतला सांगितले. रोग व किडीच्या प्रकोपाने शेतातील धानात ४० ते ५० टक्के घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.