रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST2021-07-27T04:30:35+5:302021-07-27T04:30:35+5:30

गोंदिया : शेतात धानाची रोवणी करीत असलेल्या महिला शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केला. एक महिला शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी ...

Farmer woman injured in bull attack | रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी

गोंदिया : शेतात धानाची रोवणी करीत असलेल्या महिला शेतकऱ्यांवर रानडुकराने हल्ला केला. एक महिला शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि . २५) सकाळी १० वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील बटाणा येथील शेतात घडली. कचराबाई दिना कुंभरे असे जखमी झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे. कचराबाई ही सकाळी आपल्या शेतात धानाची रोवणी करण्यासाठी शेतात गेली असता अचानक झुडपात लपून बसलेल्या रानडुकराने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या पायाला जबर मार लागला. तिला तत्काळ गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतात आहेत. जंगली डुकरांकडून होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. वनविभागाने या रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करावा तसेच जखमी झालेल्या महिलेला नुकसान भरपाई देण्याची मागणी बटाणा येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

Web Title: Farmer woman injured in bull attack