कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण

By Admin | Updated: March 18, 2016 02:09 IST2016-03-18T02:09:28+5:302016-03-18T02:09:28+5:30

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्या वतीने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, ..

Farmer Training under Agriculture Development Project | कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण

कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण

शेतकऱ्यांचा सहभाग : शेतीविषयक माहिती
बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी मोरगावच्या वतीने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.
शेतकरी प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शक म्हणून कृषी अधिकारी कार्यालयाचे मंडळ कृषी अधिकारी एन.एच. मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर, बीटीएमचे व्ही.एच. कोहाडे, कृषी सहायक व्ही.जी. पात्रीकर, आर.एन. रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच गावातील सहा महिला कृषी बचत गट तसेच चार पुरुष कृषी बचत गटांचे शेकडो महिला-पुरुष शेतकरी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी मुनेश्वर यांनी, विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. कृषी अभियांत्रिकी, शतकोटी वृक्ष लागवड, सूक्ष्म सिंचन योजना, भाजीपाला लागवड याबाबत माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर यांनी धान लागवड व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग तसेच माती परीक्षण काळाजी गरज, याबाबत मार्गदर्शन केले. व्ही.एच. कोहाडे यांनी गट शेती, उत्पादक कंपनी, आत्मा तसेच एमएसीपी अंतर्गत योजनेसंबंधी माहिती दिली. रहांगडाले यांनी सेंद्रीय शेतीविषयी माहिती विशद केली.
शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कृषी सहायक व्ही.जी. पात्रीकर यांनी करुन प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे आभार मानले. शेवटी अल्पोहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Farmer Training under Agriculture Development Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.