शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; खोबा हलबीटोला येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 17:30 IST

जखमी शेतकऱ्यावर उपचार सुरु 

गोंदिया : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा हलबी येथे गुरुवारी (दि.८) सकाळच्या सुमारास घडली. रामेश्वर रतिराम मडावी (५२) असे  अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र सहाय्यक नरेंद्र वाढई, वनरक्षक हिना राऊत, वनरक्षक पुरुषोत्तम पटले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी रामेश्वरला नवेगावबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात रेफर केले.

खोबा परिसर नवेगावबांध अभयारण्याला लागून असल्याने या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. रामेश्वर मडावी हे गुरुवारी सकाळी शेतात  काम करित असताना दबा धरुन बसलेल्या अस्वलाने त्यांच्या हल्ला करुन गंभीर जखमी केले. मागील काही दिवसांपासून या परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, पांढरी, शेंडा, खोबा, रेंगेपार परिसरात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. रामेश्वर हे अल्पभूधारक गरीब शेतकरी असून शासनाने त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रामेश्वरला वनविभागाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाईल. पहाटेच्या वेळी व रात्री शेतकऱ्यांनी एकटे शेतावर काम करण्यासाठी जावू नये. 

- सुरेश जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया