नगदी पिकांची शेती करा
By Admin | Updated: March 7, 2016 01:31 IST2016-03-07T01:31:47+5:302016-03-07T01:31:47+5:30
विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सालेकसा तालुक्यातील झालिया येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी केली.

नगदी पिकांची शेती करा
अनुप कुमार : झालियाच्या मामा तलावाची पाहणी
गोंदिया : विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सालेकसा तालुक्यातील झालिया येथील माजी मालगुजारी तलावाची पाहणी केली. या तलावाचे खोलीकरण व दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आल्याची माहिती सरपंच मनोज दमाहे यांनी दिली.
३० हेक्टर सिंचन क्षमतेच्या या तलावाच्या दुरु स्तीसाठी २८ लक्ष रु पये खर्च करण्यात आले असून स्थानिकांना यामधून रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून तलावातील गाळ काढावा, तलावाच्या परिसरात वाढलेली बेशरम ही वनस्पती काढावी, असे आयुक्तांनी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. लोकांच्या श्रमदानातून तलावाची दुरुस्ती केल्यास यंत्रणा निश्चितच पुढील कामास मदत करणार असून तलावाच्या दुरुस्तीमुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
झालिया व परिसरातील शेतकऱ्यांनी केवळ धानाचे पीक न घेता नगदी पिकांची शेती केल्यास निश्चित आर्थिक परिस्थीती सूधारेल तसेच तलावात गावातील मत्स्य सहकारी संस्थेने चांगले मत्स्यबीज टाकून त्याचे योग्यप्रकारे संगोपन करु न त्यांची विक्री करावी. त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात निश्चितच वाढ होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जिल्हा परिषद सदस्य विजय टेकाम, सरपंच मनोज दमाहे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियता पठाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी. शिंदे, उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक लेखा अधिकारी (रोहयो) कुलदीप गडलींग होते. (शहर प्रतिनिधी)