जीर्ण इमारतीत पोलिसांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:18 IST2017-09-01T01:18:10+5:302017-09-01T01:18:25+5:30
सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेणाºया पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनाच मात्र धोका पत्करुन जीर्ण इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याचे चित्र आमगाव येथे आहे.

जीर्ण इमारतीत पोलिसांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेणाºया पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांनाच मात्र धोका पत्करुन जीर्ण इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याचे चित्र आमगाव येथे आहे. या इमारतींची दुरूस्ती गेल्या अनेक वर्षांपासून न केल्याने त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जीर्ण इमारत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच पोलीस प्रशासनाने मात्र यापासून कसलाच बोध घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे. आमगाव येथील पोलीस कर्मचाºयांच्या वसाहतीच्या दुरूस्तीकडे या शासन तसेच विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी उपलब्ध असलेली वसाहत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. वसाहतीतील घरे पडक्या अवस्थेत आहेत. तर घरावरील छते, दारे, खिडक्या, गटारे, नाल्या या सर्वांचीच दुरवस्था झाली आहे. परिणामी काही कर्मचाºयांनी जीर्ण इमारतीचा धोका ओळखून भाड्याने घर घेवून राहणे पसंत केले.
तर काहींना पर्याय नसल्याने ते येथेच धोका पत्करुन वास्तव्यास आहेत. कर्मचारी वसाहतीच्या परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. इमारतीवरील प्लास्टीकच्या टाक्यांची झाकणे देखील गायब झाली आहेत. उघड्या पाण्याच्या टाक्यामुळे डेंग्यूच्या डासांसाठी योग्य ठिकाण ठरले आहे.
या परिसरात पावसाचे पाणी व घाण साचल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस विभाग व नगर परिषदने यासंदर्भात कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे जीर्ण इमारतींमध्ये पोलीस कर्मचाºयांना राहावे लागत आहे.