दारूने केले कुटुंब उद्ध्वस्त
By Admin | Updated: September 29, 2016 00:16 IST2016-09-29T00:16:45+5:302016-09-29T00:16:45+5:30
एखादा असाध्य रोग त्या व्यक्तीला संपविते, परंतु व्यसन हे त्या कुटुंबालाच संपविते. याचे प्रत्यक्ष उदाहरण गोंदियाच्या गोंडीटोला कुडवा येथे पहायला मिळाले.

दारूने केले कुटुंब उद्ध्वस्त
पती-पत्नी जळीतप्रकरण : ४ वर्र्षांची चिमुकली झाली अनाथ
गोंदिया : एखादा असाध्य रोग त्या व्यक्तीला संपविते, परंतु व्यसन हे त्या कुटुंबालाच संपविते. याचे प्रत्यक्ष उदाहरण गोंदियाच्या गोंडीटोला कुडवा येथे पहायला मिळाले. पतीच्या दारूच्यामुळे संतापलेल्या पत्नीने स्वत:च आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु तिला वाचविण्याच्या नादात दारूड्या पतीचाही मृत्यू झाला. शहारे कुटुंबातील दाम्पत्याचा या घटनेत मृत्यू झाला. यामुळे त्यांची ४ वर्षाची चिमुकली पाच तासात अनाथ झाली.
घटनेच्या पूर्वी आई वडीलांच्या लाडीगोडीत वाढणारी चार वर्षाची चिमुकली अवघ्या पाच तासात अनाथ झाली. पतीपत्नीचा नेहमीचा व्यसनासाठी वाद व्हायचा परंतु या व्यसनाने अवघ्या पाच तासात ४ वर्षाच्या ईशीका उर्फ चुटकी हिला अनाथ करून सोडले. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोंडीटोला (कुडवा) येथील चतूर्भुज हगरु शहारे (३५) हा गोंदियाच्या माताटोली येथील एका प्लास्टीक कंपनीत काम करायचा. त्याला दारूचे व्यसन जडले होते. या दारूच्या व्यसनातून त्या पती-पत्नीचे खाके उडायचे. सोमवारच्या सायंकाळी ७.३० वाजता चतूर्भुज दारू पिऊन आला. त्यामुळे कविता चतूर्भूज शहारे (३०) हिने तुम्ही पुन्हा दारू पिऊन आलात यामुळे मी माझी जीवनयात्रा संपविते म्हणून घरात ठेवलेली रॉकेलची डबकी आणली. रिने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. तिला वाचविण्यासाठी आलेला चतुर्भूजही गंभीररित्या भाजला. त्यांना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास याची सूचना पोलिसांना मिळाली. सहाय्यक फौजदार ईश्वर बोंदरे व हवालदार मनोहर अंबुले यांनी त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय गाठले. चतुर्भूजला रूग्णालयात आणताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. पत्नी कविता हिचा मृत्यूपूर्वी बयान पोलिसांनी नोंदविला. पतीच्या दारूच्या व्यसनामुळे कंटाळल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कविताने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या बयानात म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)
तहसीलदार, नायब तहसीलदार आलेच नाही
महत्वाच्या घटनेत मृत्यूपूर्वी बयान तहसीलदाराच्या उपस्थितीत लिहायचा असतो. ह्या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तहसीलदार हिंगे व नायब तहसीलदार यांना फोनवरून माहिती देऊन बयान घेण्यासाठी बोलावले. परंतु तहसीलदार किंवा नायब तहसीलदार आलेच नाही. कविताचा मृत्यूपूर्वी बयान नोंदविणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकारी येलम यांच्या साक्षीने तिचे बयान नोंदविले.
अन् कविताचा राग अनावर झाला
४मृतक कविता सायंकाळी ७.३० वाजता आपली मुलगी ईशिका हिच्यासोबत घरात आनंदात टीव्ही पाहात होत्या. परंतु मद्यप्राशन करून आलेल्या पतीला पाहून कविताला राग आला. या रागात तिने रॉकेल ओतून आत्महत्या केली. सायंकाळी ७.३० वाजता आपल्या आईसोबत आनंदात टीव्ही पाहणाऱ्या ईशीका उर्फ चुटकीला अवघ्या पाच तासात अनाथ व्हावे लागले. या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले. एका दारूच्या व्यसनापायी ४ वर्षाच्या चुटकीची पर्वा न करता आई वडीलांनी आत्महत्या केली. यात त्या निर्दोष चुटकीला आयुष्य अनाथात घालवावा लागणार आहे. तिचे संगोपण करण्यासाठी काकांनी आपल्याकडे कुडवा येथे आणल्याचे सांगण्यात आले.