मूर्त्यांना दिला जातोय ‘फायनल टच’

By Admin | Updated: September 16, 2015 02:22 IST2015-09-16T02:22:22+5:302015-09-16T02:22:22+5:30

मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची लगबग वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.

False touch is given to the idols | मूर्त्यांना दिला जातोय ‘फायनल टच’

मूर्त्यांना दिला जातोय ‘फायनल टच’

गोंदिया : मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची लगबग वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्त्यांचे शहरात आगमन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे वेळेवर मूर्त्यांचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांचे रात्रीला जागून काम सुरू असून ते मूर्त्यांना ‘फायनल टच’ देताना दिसून येत आहेत.
येत्या गुरूवारपासून (दि.१७) गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय. शहरात मोठ्या प्रमाणात खासगी व सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. परिणामी गणरायांचे हे १० दिवस नवचैतन्याने बहरलेले असतात. यामुळेच गोंदिया शहरातील गणेशोत्सवाची जिल्हाच काय लगतच्या छत्तीसगड व मध्य् ाप्रदेश राज्यांतही ख्याती आहे. मात्र आता गणरायांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक असल्याने शहरात एकच गर्दी दिसून व सर्वांना लगबग दिसून येत आहे.
शहरातील काही गणेश मंडळ गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे देखावे व मुर्ती या मोठ्या बजेटच्या राहत असल्याने ही सर्व कामे आटोपण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत असताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे काही मंडळांच्या मुर्त्यां छत्तीसगड राज्यात तयार होतात. त्यामुळे गणेश मंडळ आपल्या मुर्त्या आणण्यासाठी रवाना झाले असून मूर्त्यांचे आगमन सुरू झाले आहे. तर मंडपांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कारागिर दिवसरात्र एक करून कामाला लागले आहेत.
गणराय येणार असल्याने महिला वर्गही घराच्या साफसफाई व डेकोरेशनला लागले आहे. तसेच गणरायांना १० दिवस कोणता नैवेद्य लावायचा व मोदकांच्या तयारीत व्यस्त दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सर्व लगबगीत मूर्तिकारही मागे नाही. त्यांनी घेतलेले मूर्त्यांचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार आपल्या परिवारासह डोळ््यात तेल घालून काम करीत आहेत. तर आपल्या मुर्त्यांची तयारी पूर्ण करवून घेण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मूर्तिकारांकडे तळ ठोकून बसले आहेत. मूर्तिकारांचे बस्तान सध्या येथील सिव्हील लाईन्स परिसरात असल्याने हा परिसर गजबजून गेला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: False touch is given to the idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.