लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका धान पिकांना बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड झाला. शेतकरी धानाची मळणी करुन तो धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. पण पाखड धान खरेदी करण्याचे आदेश नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात आहे.त्यामुळे पाखड धान खरेदी केंद्रावरुन बाद झाल्याने शेतकºयांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.शेतकरी बांधव खरीप हंगामातील हलक्या धानाची दिवाळीपूर्वी कापणी आणि मळणी करुन विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करण्यास मदत होते. सुदैवाने यंदा धान पिकांसाठी अनुकुल असा पाऊस झाल्याने धानपीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकºयांना सुध्दा यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती. मात्र या अपेक्षेवर आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे पाणी फेरले. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची कापणी केली होती. कापणी केलेला धान बांध्यामध्ये पडून होता.याच दरम्यान परतीचा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात धानाच्या कडपा भिजल्या.काही शेतकऱ्यांचे धान दोन तीन दिवस पाण्यात पडून राहिल्याने धानाला अंकुर फुटले तर काही धान पाखड झाले. त्यामुळे शेतकºयांनी धान खरेदी केंद्रावर पाखड झालेला धान खरेदी करण्याची सुट देण्याची मागणी शासनाकडे केली होती. शासन यावर नक्कीच काही तरी तोडगा काढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आता जेव्हा शेतकरी पाखड धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेत आहेत. तेव्हा तो धान खरेदी करण्यास नकार दिला जात आहे.त्यामुळे शेतकºयांना धानाची विक्री न करताच परतावे लागत आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पाखड धान खरेदी करु नये असे निर्देश असल्याने खरेदी करता येत नसल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेने पाठविला ठरावजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी (दि.१४) पार पडली. यासभेत जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला आहे.त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड झालेला धान खरेदी करण्यात यावा. असा ठराव पारीत करुन तो शासनाकडे पाठविण्याची मागणी केली.याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. तसेच ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सभेला स्थायी समितीचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुध्दा उपस्थित होते.गोदामांचा प्रश्न कायमजिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते.मात्र खरेदी केलेला धान साठवणुकीसाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था करण्यात आली नाही.त्यामुळे गोदामांचा प्रश्न कायम आहे.हा प्रश्न सुध्दा मार्गी लावण्याची मागणी केली आहे.२५ हजार क्विंटल धान खरेदीजिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे मागील आठ दिवसांपासून एकूण ६२ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदीला सुरूवात केली आहे. या सर्व धान खरेदी केंद्रावरुन आत्तापर्यंत २५ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली असल्याचे फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाखड धान खरेदी केंद्रावरुन बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST
शेतकरी बांधव खरीप हंगामातील हलक्या धानाची दिवाळीपूर्वी कापणी आणि मळणी करुन विक्री करतात. यामुळे शेतकºयांना दिवाळी सण साजरा करण्यास मदत होते. सुदैवाने यंदा धान पिकांसाठी अनुकुल असा पाऊस झाल्याने धानपीक चांगले आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा यंदा चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा होती.
पाखड धान खरेदी केंद्रावरुन बाद
ठळक मुद्देशेतकऱ्यांची कोंडी : फेडरेशन म्हणते शासनाचे आदेश नाही, परतीच्या पावसाचा फटका