प्लास्टिकच्या अतिवापराने प्रजनन क्षमता धोक्यात !
By Admin | Updated: April 26, 2015 01:16 IST2015-04-26T01:16:57+5:302015-04-26T01:16:57+5:30
जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबीयांचा दिवस दूध साठवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीपासून सुरू होतो आणि रात्री भाजीपाला आणलेल्या प्लास्टिकच्याच पिशवीने मावळतो.

प्लास्टिकच्या अतिवापराने प्रजनन क्षमता धोक्यात !
गोंदिया : जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबीयांचा दिवस दूध साठवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीपासून सुरू होतो आणि रात्री भाजीपाला आणलेल्या प्लास्टिकच्याच पिशवीने मावळतो. यादरम्यान दिवभर कधी प्लास्टिकची पाण्याची बादली तर कधी प्लास्टिकच्या टिफिनमधील जेवण असा प्लास्टिकशी सारखा संबंध येत असतो. परंतु याच प्लास्टिकच्या वापराचे पर्यावरणासह मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या बिसफिनाल या घटकाचा सर्वात मोठा धोका पुरूषांच्या प्रजनन क्षमतेला निर्माण होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. काशी विद्यापीठाच्या चिकित्सा विज्ञान संस्थेच्या इंड्रो क्राईम विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. निरजकुमार अगरवाल यांनी नुकतेच प्लास्टिकवर संशोधन केले. त्यात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. (शहर प्रतिनिधी)