पुराम यांच्या पुढाकाराने नेत्र तपासणी

By Admin | Updated: August 6, 2015 00:52 IST2015-08-06T00:52:05+5:302015-08-06T00:52:05+5:30

आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या जन्मदिनी ७ आॅगस्टला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Eye inspection by Pauram's initiative | पुराम यांच्या पुढाकाराने नेत्र तपासणी

पुराम यांच्या पुढाकाराने नेत्र तपासणी

जन्मदिनाचे औचित्य : चष्मे वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
देवरी : आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या जन्मदिनी ७ आॅगस्टला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे गरीब रुग्णांची सेवा करून आपला जन्मदिवस साजरा करणारे संजय पुराम यांच्या जन्म दिवशी ७ आॅगस्टला श्री स्वामी समर्थ नेत्रालय, नागपूर व आ. संजय पुराम मित्र परिवार यांच्या संयुुक्त विद्यमाने शुक्रवारला ७ आॅगस्ट रोजी शासकीय आश्रमशाळा बोरगाव बाजार ता. देवरी येथे मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचबे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात श्री स्वामी समर्थ नेत्रालय नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोतिबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथे करण्याकरिता रुग्णांना पाठविण्यात येणार आहे. तसेच बोरगाव आश्रमशाळा परिसरात आरोग्य तपासणी शिबिरात विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येईल व नंतर आश्रम शाळेच्या आवारात आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ७ आॅगस्टला आ. संजय पुराम यांच्या जन्मदिवसानिमित्त देवरी तालुका भाजपचे अध्यक्ष प्रमोद संगीडवार यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय देवरी येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत. नेत्र तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम व मित्र परिवाराने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Eye inspection by Pauram's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.