शेतीला विद्युत पुरवठा करण्यास कमालीचा विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST2021-03-10T04:29:46+5:302021-03-10T04:29:46+5:30
बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोणामुळे बाक्टी-चान्ना येथील ५ शेतकऱ्यांच्या विहिरींना वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत असल्याची ओरड ...

शेतीला विद्युत पुरवठा करण्यास कमालीचा विलंब
बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोणामुळे बाक्टी-चान्ना येथील ५ शेतकऱ्यांच्या विहिरींना वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत असल्याची ओरड आहे. परिणामी या शेतकऱ्यांना पीक घेणे अशक्य झाले आहे.
बाक्टी येथील एकनाथ शहारे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान योजनेंतर्गत शेतात बोअरवेलसह विहीर खोदण्यात आली. त्यांच्याच शेतशिवाराजवळील अन्य चार शेतकऱ्यांनी शेतात विहीर खोदली आहे. स्वत:च्या शेतात पाण्याची सोय झाल्याने बारमाही पीक घेण्याची संधी त्या शेतकऱ्यांना चालून आली. विहिरीच्या पाण्यातून जलसिंचन होण्यासाठी वीजपुरवठा व्हावा या हेतूने त्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह वीज वितरण कंपनीकडे अर्स सादर केला. मागील वर्षी २५ फेब्रुवारी २०२० रोजी डिमांड पोटी पाच हजार ८०६ रुपयांचा भरणा सुद्धा केला.
याला आता तब्बल एक वर्षांचा कालावधी होऊन सुद्धा आजपावेतो त्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सौजन्य दाखविले नाही. वीजपुरवठा होऊ न शकल्याने त्या शेतकऱ्यांना शेती उत्पादनापासून वंचित रहावे लागत आहे. कुंभकर्णी झोपी गेलेल्या वीज वितरण कंपनीला जाग केव्हा येईल हे कळायला मार्गच दिसत नाही.