अतिदुर्मिळ ‘फोस्टन फॅट’ साप आढळला

By Admin | Updated: July 20, 2015 01:28 IST2015-07-20T01:28:27+5:302015-07-20T01:28:27+5:30

रावणवाडी मंदिरातील प्रकार : अड्याळ येथील सर्पमित्रांनी दिले जीवदान

Extra-hard 'Foston Fat' snake found | अतिदुर्मिळ ‘फोस्टन फॅट’ साप आढळला

अतिदुर्मिळ ‘फोस्टन फॅट’ साप आढळला



अड्याळ : अतिदुर्मिळ समजल्या जाणाऱ्या फोस्टन फॅट (मांजऱ्या साप) रावणवाडी येथील अंबा माता मंदिरात आढळला. यामुळे त्याला बघणाऱ्यांची एकच गर्दी उडाली होती.
हा साप बिनविषारी असून तो मुख्यत्वे पश्चिम बंगाल, ओरीसा, हिमालयात आढळतो. महाराष्ट्रात तो आढळल्याचे क्वचित उदाहरण ऐकिवात आहे. रावणवाडी येथील अंबामाता मंदिरात साप असल्याची माहिती सर्पमित्र आशिक नैतामे यांना मिळाली. त्यांनी मंदिरात पोहचून साप बघितले असता तो फोस्टन फॅट प्रजातीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याला पकडून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. यात दुर्मिळ सापाची महती केवळ पुस्तकामध्ये वाचायला मिळत होती. त्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. नागरिकांनी त्याला विषारी साप समजून मारले असते, सर्पमित्रामुळे दुर्मिळ सापाला जीवदान मिळाले. (वार्ताहर)

Web Title: Extra-hard 'Foston Fat' snake found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.