५४ हजार वीज ग्राहकांकडे १६.५ कोटींची थकबाकी

By Admin | Updated: November 10, 2014 22:44 IST2014-11-10T22:44:46+5:302014-11-10T22:44:46+5:30

जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी पंपधारक, पाणी पुरवठा योजना, पोल्ट्रीफार्म, ग्रामपंचायत, पब्लिक सर्विसेस व तात्पूरर्त्या स्वरुपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या ५३ हजार ९४२ ग्राहकांवर

Extinction of Rs. 16.5 crores to 54 thousand electricity consumers | ५४ हजार वीज ग्राहकांकडे १६.५ कोटींची थकबाकी

५४ हजार वीज ग्राहकांकडे १६.५ कोटींची थकबाकी

नरेश रहिले - गोंदिया
जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी पंपधारक, पाणी पुरवठा योजना, पोल्ट्रीफार्म, ग्रामपंचायत, पब्लिक सर्विसेस व तात्पूरर्त्या स्वरुपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या ५३ हजार ९४२ ग्राहकांवर १६ कोटी ५ लाख १० हजार रुपयांची विद्युत बिलाची थकबाकी आहे.
सर्वाधिक थकबाकी कृषी पंपधारकांवर आहे. आठही तालुक्यात १६ हजार २४५ कृषीपंपधारक ग्राहकांवर ७ कोटी ६३ लाख २१ हजारांची थकबाकी आहे. त्याखालोखाल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिवाबत्तीसाठी वीज जोडणी घेतलेल्या ६९६ ग्राहकांवर ३ कोटी ४२ लाख ७७ हजार रुपये थकबाकी आहे.
थकबाकीदार ग्राहकांची संख्या विचारात घेतल्यास सर्वाधिक ग्राहक घरगुती कनेक्शनधारक आहेत. अशा ३२ हजार ९३८ ग्राहकांवर २ कोटी ७२ लाख २२ हजारांची विद्युत थकबाकी आहे. व्यावसायिक ग्राहक असलेल्या २ हजार ७२५ ग्राहकांकडे ८६ लाख ५ हजार रुपयांची थकबाकी आहे. औद्योगिक क्षेत्रातील ५२२ ग्राहकांवर ७८ लाख २५ हजाराची थकबाकी आहे.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व नगर परिषदेअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या विभागाच्या २८८ ग्राहकांवर ३७ लाख ७७ हजार विद्युत बिल थकीत आहे. पोल्ट्रीफार्मसाठी २४ कनेक्शन धारकांवर २ लाख ९७ हजाराची विद्युत थकबाकी आहे. दवाखाने, पोलिस ठाणे व डाकविभाग अशा पब्लिक सर्विसेस असलेल्या ४९० ग्राहकांवर २१ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे. तसेच तात्पुरत्या स्वरुपाचे कनेक्शन घेतलेल्या १४ ग्राहकांवर ५० हजार रुपये बिलाची थकबाकी आहे.
अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेवून विद्युत वापरणाऱ्या ग्राहकांनी बील भरण्यास महिनाभर उशीर केला तर त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मात्र विद्युत कर्मचारी अधिकारी यांच्या डोळ्यासमोर आकडे टाकून विद्युत चोरी होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Extinction of Rs. 16.5 crores to 54 thousand electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.