विस्तार अधिकारी निलंबित
By Admin | Updated: May 5, 2017 01:36 IST2017-05-05T01:36:36+5:302017-05-05T01:36:36+5:30
स्थानिक पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी अहिल्या खोब्रागडे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबीत केले आहे.

विस्तार अधिकारी निलंबित
सडक-अर्जुनी पं.स.अपहार प्रकरण : मुकाअंनी केले निलंबीत
अर्जुनी-मोरगाव : स्थानिक पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी अहिल्या खोब्रागडे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबीत केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, पंचायत समिती सडक-अर्जुनी येथील शिक्षण विभागात घोटाळा उघडकीस आला होता. यात तत्कालीन अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांविरूध्द डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. चौकशीत खोब्रागडे यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
यापूर्वी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. काही सेवानिवृत्त झाले. कर्तव्यावर असतांना कसून केल्याबद्दल काहींना निलंबीत करण्यात आले मात्र खोब्रागडे यांना निलंबीत करण्यात आले नाही. हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी स्थायी समितीच्या सभेत उचलला होता.
अखेर सडक-अर्जुनी पं.स.च्या तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी खोब्रागडे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १९ एप्रिलच्या आदेशान्वये निलंबीत केले आहे. निलंबनकाळात त्यांचे मुख्यालय पं.स.आमगाव येथे निश्चित करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)