नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला, जंगलात पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 04:43 PM2021-11-08T16:43:06+5:302021-11-08T18:01:11+5:30

सालेकसा येथील कमांडो पथक व बीडीडीएस पथक गोंदिया यांनी गडमाता पहाडी-बेवारटोला डॅमजवळील जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवून नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी जंगलात पेरून ठेवलेले घातपाताचे साहित्य जप्त केले.

Explosives seized from forest near Bewartola Dam in gondi district | नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला, जंगलात पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला, जंगलात पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त

Next
ठळक मुद्देबेवारटोला डॅमजवळील जंगल परिसरातील घटनागोंदिया पोलिसांची कारवाई

गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी जंगलात पेरून ठेवलेले घातपाताचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. ही कारवाई ७ नोव्हेंबर रोजी नक्षल सेल गोंदिया यांनी केली.

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा जंगल परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य पेरून ठेवले आहे, अशी माहिती नक्षल सेल गोंदिया यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात नक्षल सेल गोंदियाचे अधिकारी व अंमलदार, सी-६० गोंदिया व सी-६० सालेकसा येथील कमांडो पथक व बीडीडीएस पथक गोंदिया यांनी गडमाता पहाडी-बेवारटोला डॅमजवळील जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवून गडमाता पहाडीच्या भागात संशयास्पद वस्तू शोधल्या.

श्वान पथक व बीडीडीएस पथकाच्या मदतीने खबरदारीच्या उपाययोजना करून पाहणी केली असता, नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी स्फोटके साहित्य लपवून ठेवले होते. ते स्फोटक साहित्य बीडीडीएस पथकाच्या मदतीने बाहेर काढले.

हे साहित्य केले जप्त

८० फूट वायर, ८ नग जिलेटिन कांड्या, ३ नग नॉनइलेक्ट्रिक डिटोनेटर, दोन चाकू, दोन गावठी बंदुकीचे राउंड, १ मेडिसिनचा डबा, २ मॅग्झिनसह पिस्टल, २० लीटरचा एक ड्रम, नक्षलवाद्यांच्या गणवेशाचे कापड, १ बॅटरी, ११ इलेक्ट्रिक वायरसह डिटोनेटर, २ प्रिंटेड सर्किट बाेर्ड, ५ राउंड ७.६२ एमएम राउंड एसएलआरचे, ७०० ग्रॅम हिरव्या रंगाची स्फोटक सदृश्य पावडर, २ देशी कट्टे, ७०० ग्रॅम राखडी रंगाची स्फाेटक सदृश्य पावडर आदी साहित्य घटनास्थळावरून जप्त केले.

या संदर्भात सालेकसा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, १२०, सहकलम १३,१८,२०,२३ यूएपीए सहकलम ४, ५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा सहकलम ३,२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये नक्षलवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल करीत आहेत.

Web Title: Explosives seized from forest near Bewartola Dam in gondi district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.