दंत तपासणी शिबिर उत्साहात

By Admin | Updated: March 19, 2017 00:35 IST2017-03-19T00:35:08+5:302017-03-19T00:35:08+5:30

लोकमत बाल विकास मंच व गोंदिया पब्लिक स्कूल गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने दंत तपासणी

With the examination of the dental checkup camp | दंत तपासणी शिबिर उत्साहात

दंत तपासणी शिबिर उत्साहात

बाल विकास मंच व गोंदिया पब्लिक स्कूलचा संयुक्त उपक्रम
गोंदिया : लोकमत बाल विकास मंच व गोंदिया पब्लिक स्कूल गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने दंत तपासणी व काऊन्सलींग शिविर गोंदिया पब्लिक स्कूल येथे घेण्यात आले. या शिबिरात आॅर्थो डेन्टीस्ट डॉ.अवधेश अग्रवाल यांच्यावतीने उपस्थित बालक व पालक यांची दंत तपासणी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका ईरा शर्मा, लोकमत बालविकास मंचचे संयोजक श्रीकांत पिल्लेवार उपस्थित होते. डॉ.अग्रवाल यांनी शरीरातल्या विविध अंगांसारखेच दात हे महत्वाचे आहेत. आमच्या व्यक्तिमत्व विकासात दांताची महत्वाची भूमिका असते. आम्हाला दांतांचा पूर्णपणे काळजी घेणे महत्वाचे ठरते.
लहान वयात असताना बालकांना चॉकलेटसारख्या गोड पदार्थाची आवड मोठी असते. यामुळे शरिराला विटामिन मिळते पण दातांची पतासणी वेळोवेळी न केल्याने दांतांच्या सडण्याच्या क्रियेला सुरुवात होत असून कमकुवत होते. याचा त्रास त्यांना सोसावा लागतो. यासाठी आवश्यक त्यावेळी दांतांची तपासणी चिकित्सकाकडून करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बालकांसोबत पालकांनीही या शिबिरात दंत तपासणी करुन शिबिराला मोठा प्रतिसाद दिला.
समाज हिताला लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करने गरजेचे आहे आणि निस्वार्थ सेवा करुन समाज विकासात मोठा योगदान दयायला पाहिजे असे मत संस्थाध्यक्ष अर्जुन बुद्धे व सचिव डॉ. इंदिरा सपाटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका लता कोलू यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: With the examination of the dental checkup camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.