रोग निदान शिबिरात १६२ रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:53+5:302021-07-07T04:35:53+5:30
तिरोडा : आयुष्यमान भारत व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्याच्या दृष्टीने ...

रोग निदान शिबिरात १६२ रुग्णांची तपासणी
तिरोडा : आयुष्यमान भारत व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिर रविवारी (दि.४) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १६२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, १२ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
शिबिरात सर्जरी विभागात २१ हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह व किडनीचे आजार असलेले ४३, गर्भाशयाचे आजार ४, बालरोग विभागात ३२, अस्थिरोगाचे ११, डोळ्यांचे आजार २३, नाक, कान, घसा संबंधी १० व जनरल १८ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. १२ रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्यामुळे मंगळवारी भर्ती करून बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम, डॉ. पोषण बिसेन, डॉ. विमलेश अग्रवाल, डॉ. शीतल खंडेलवाल, डॉ. तृप्ती भगत, डॉ. सोनम श्रीवास्तव, डॉ. चंद्रकिशोर पारधी, डॉ. संदीप मेश्राम, डॉ. आशिष बन्सोड, डॉ. अर्चना गहेरवार, डॉ. प्रिया ताजणे, डॉ. विद्या रहांगडाले, राहुल बडगेल कृष्णमोहन, आकाश वराडे, क्षिप्रा तिराळे, किरण ढोके, जयश्री बघेले, कमलेश शुक्ला, अनमोल लोखंडे, लीलाधर कुसराम, दिनेश बल्ले, रवी चोखांद्रे यांनी सहकार्य केले. शिबिराला लायन्स क्लब तिरोडाचे अध्यक्ष राजेंद्र बुराडे, सचिव देवदत्त देशपांडे, प्रकाश गेडाम व कोषाध्यक्ष भोजेंद्र बोपचे यांनी सहकार्य केले.