कलेचा सांस्कृतिक ठेवा हा प्रत्येकाने जपावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:17+5:302021-02-05T07:51:17+5:30
बाराभाटी : आपला समृद्ध परिसर हा विविध कलांनी रंगून गेला आहे. महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी आहे, म्हणूनच कलेचा सांस्कृतिक ...

कलेचा सांस्कृतिक ठेवा हा प्रत्येकाने जपावा ()
बाराभाटी : आपला समृद्ध परिसर हा विविध कलांनी रंगून गेला आहे. महाराष्ट्र ही कलावंतांची भूमी आहे, म्हणूनच कलेचा सांस्कृतिक वारसा व ठेवा हा प्रत्येकाने जपावा, असे प्रतिपादन कलावंत व शिक्षक के.ए. रंगारी यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच अरविंद नागपुरे, बाबूलाल नेवारे, सतीश कोसरकर, तुलाराम मेश्राम, भीमराव मेश्राम, दूर्वास वाळवे, विलास शहारे, संतोष परशुरामकर, सुरेश उईके, भूमिता तीरपुडे, वंदना लांजेवार, संजीवनी गजभिये, अनिता परतेकी, शशिकला पुस्तोडे, राजकुमार तिरपुडे, रमेश रामटेके, नमुदेव कागपते, माणिक गजभिये, प्रशांत रामटेके, नरेंद्र कागपते उपस्थित होते. अक्षरा ग्रुप ऑफ सोसीयल बहु. संस्था सालई आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक स्पर्धा, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हळदी-कुंकू, भाषण स्पर्धा, नृत्य स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा घेऊन स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक सचिव दिलीप रामटेके यांनी, तर संचालन निकेश रामटेके यांनी केले. आधार किशोर वासनिक यांनी मानले. रिना रामटेके, देवचंद इलमकर, शुभम रामटेके, मिथून रामटेके, कश्यप रामटेके, हर्षानंद रामटेके यांनी सहकार्य केले.