कोरोनाच्या मुक्तीसाठी लसीकरण सर्वांनी घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:30 IST2021-04-27T04:30:13+5:302021-04-27T04:30:13+5:30
बाराभाटी : कोरोनाचा कहर वाढला आहे, बचावासाठी हे लसीकरण आरोग्याच्या हितासाठी उपयुक्त ठरेल असा आमचा आत्मविश्वास आहे. कोरोनापासून सर्व ...

कोरोनाच्या मुक्तीसाठी लसीकरण सर्वांनी घ्यावे
बाराभाटी : कोरोनाचा कहर वाढला आहे, बचावासाठी हे लसीकरण आरोग्याच्या हितासाठी उपयुक्त ठरेल असा आमचा आत्मविश्वास आहे. कोरोनापासून सर्व नागरिक दुरुस्त व्हावे, लवकर आरोग्यमुक्त होतील याच हेतूने आम्ही लसीकरण करतो, म्हणून कोरोनाच्या मुक्तीसाठी लसीकरण करून घ्यावे, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबर मडावी यांनी केले.
जवळच्या येरंडी या गावात आरोग्य उपकेंद्र कुंभीटोलाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सदर गावातील ७० लोकांचे लसीकरण २६ एप्रिलला करण्यात आले. यावेळी ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी गौरव टेंभेकर, शिक्षक सुरेश मेश्राम, आरोग्य सेवक राजेंद्र वघारे, आरोग्य सेविका व्ही. जी. साखरे, कंत्राटी मदतनीस लीला कांबळे, आशा वर्कर मंगला नैताम यांनी लसीकरण केले.