समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटित व्हावे

By Admin | Updated: October 12, 2014 23:36 IST2014-10-12T23:36:31+5:302014-10-12T23:36:31+5:30

आपला समाज जिल्ह्यात भरपूर प्रमाणात आहे. समाजबांधवांवर कोणतीही आपत्ती आल्यास प्रथमत: समाजबांधवांनी धावून जाण्याची गरज आहे. समाजाच्या विकासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न

Everyone should be organized for the development of society | समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटित व्हावे

समाजाच्या विकासासाठी सर्वांनी संघटित व्हावे

तिरोडा : आपला समाज जिल्ह्यात भरपूर प्रमाणात आहे. समाजबांधवांवर कोणतीही आपत्ती आल्यास प्रथमत: समाजबांधवांनी धावून जाण्याची गरज आहे. समाजाच्या विकासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे जिल्हाध्यक्ष उमेंद्र भेलावे यांनी समाजाच्या कोजागिरी कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमात तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी राजेश कावळे, सचिव नितेश खोब्रागडे, शहर आघाडी अध्यक्ष संजू सुपारे, सचिवपदी आनंद मलेवार यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला सुरेश धुर्वे, तोमीचंद कापसे, जिल्हा सचिव मुकुंद धुर्वे, जिल्हा कार्याध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, हेमलता खोब्रागडे, तालुका अध्यक्ष गजानन फटिंग, सचिव जयप्रकाश खोब्रागडे, भरत मलेवार, अ‍ॅड. अशोक मलेवार, चित्रा कापसे, निता खोब्रागडे, श्रृती फटींग, जयश्री बावनकर, सविता रुद्रकार, नरेंद्र आगाशे, ममता मलेवार, डी.डी. गिरीपुुुंजे, कमल कापसे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चित्रा कापसे यांनी केले. प्रास्ताविक गजानन फटींग यांनी मांडले. आभार डी.आर. गिरीपुंजे यांनी मानले. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Everyone should be organized for the development of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.