उद्देशपत्रिकेची पूर्तता करण्याची जबाबदारी प्रत्येकाची ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:53+5:302021-02-05T07:49:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वांतत्र्यसंग्राम सेनानी आणि संविधान निर्मात्यांनी भारताला सुजलाम् सुफलाम् करून देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ...

उद्देशपत्रिकेची पूर्तता करण्याची जबाबदारी प्रत्येकाची ()
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वांतत्र्यसंग्राम सेनानी आणि संविधान निर्मात्यांनी भारताला सुजलाम् सुफलाम् करून देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता निर्माण करण्याचे स्वप्न उद्देशपत्रिकेत रेखाटले आहे. संविधान निर्मात्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची आणि देशाला विकसित करून सामाजिक सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य निर्माण करून देशात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने उद्देशपत्रिकेनुसार आचरण करावे, असे प्रतिपादन प्राचार्या डाॅ. शारदा महाजन यांनी केले.
येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. डॉ. महाजन यांनी संविधान आणि उद्देशपत्रिकेनुसार आचरण करण्याची आपली जबाबदारी तर आहेच. सोबतच समाजात संविधानिक मुल्यांची रुजवात करणे, हे सुद्धा आपले कर्तव्य असून, त्यासाठी आपणा सर्वांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असे सांगितले. कोविड या जागतिक महामारीला आपण भारतीय धीटपणे सामोरे गेलो. एकजुटीने लढल्यामुळे आपण या महामारीचा मुकाबला यशस्वीपणे करू शकलो. हीच एकजूट निर्माण करण्याचे आणि विविध खंड, भाषा आणि प्रदेशात विखुरलेल्या भारताला एकसंघ ठेवण्याचे काम आपले संविधान आणि उद्देशपत्रिका करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी उद्देशपत्रिकेप्रमाणे आचरण करावे, असे सांगितले. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी कॅप्टन डाॅ. एच. पारधी यांनी केले तर डॉ. परवीन कुमार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. पारधी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन मेश्राम, शारीरिक शिक्षक डॉ. परवीन कुमार यांनी सहकार्य केले. यावेळी नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.