नऊ स्मरणपत्रानंतरही ‘सिटीस्कॅन’ मशीन बंदच

By Admin | Updated: April 8, 2017 00:52 IST2017-04-08T00:52:14+5:302017-04-08T00:52:14+5:30

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय आता वैद्यकीय महाविद्यालयात विलीन झाले. तरीही २६ जानेवारी २०१६ रोजी बिघडलेली सिटीस्कॅन मशीन

Even after nine reminders, the 'CISCAN' machine was locked | नऊ स्मरणपत्रानंतरही ‘सिटीस्कॅन’ मशीन बंदच

नऊ स्मरणपत्रानंतरही ‘सिटीस्कॅन’ मशीन बंदच

सव्वा वर्षापासून रूग्णांची गैरसोय : ९ लाख ८८ हजार न दिल्याचा फटका
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय आता वैद्यकीय महाविद्यालयात विलीन झाले. तरीही २६ जानेवारी २०१६ रोजी बिघडलेली सिटीस्कॅन मशीन आतापर्यंत ही मशीन बंदच आहे. यासंदर्भात नऊ वेळा स्मरणपत्र देण्यात आले. परंतु आरोग्य सेवा सहसंचालक यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
विकासाच्या बाता हाकणाऱ्या शासनाच्या काळात गोंदियाच्या शासकीय रूग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सव्वा वर्षापासून बंदच आहे. लाईफ लाईन एक्सप्रेसच्या उदघाटनाला ४ मे २०१६ रोजी आरोग्यमंत्री आले असताना त्यांनी सदर सिटीस्कॅन मशीन सुरू करण्याचे आदेश दिलेत. तर पालकमंत्र्यानीही जिल्हा शल्यचिकीत्सक व मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांना कानपिचक्या दिल्या होत्या, परंतु अजूनही त्यांच्या आदेशाची अमंलबजावणी झाली नाही. ही मशीन मागील सव्वावर्षाभरापासून बंद आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. येथील रूग्णांना खासगी रूग्णालयात सेवा घ्यावी लागते.
या सिटीस्कॅन मशीनची दुरूस्ती करण्यात आली नाही. दुरूस्तीसाठी बाहेरून व्यक्ती आणावे लागले. जर्मनी येथून या सिटीस्कॅनचे साहित्य आणण्यात आले. येथील रूग्णांना सिटीस्कॅन ची सेवा घेण्यासाठी खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे एका रूग्णावर अडीच हजार रूपये सिटीस्कॅनचा खर्च पडतो. गरिब रूग्णांच्या माथ्यावर सिटीस्कॅनचा भार सव्वावर्षापासून पडत आहे. केटीएस जिल्हा समान्य रूग्णालयात बसविण्यात आलेली सिटीस्कॅन मशीन बंद असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रूग्णांनाही खासगी रूग्णालयाची सेवा घ्यावी लागत आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांचे चांगलेच फावले आहे. मात्र गरिब रूग्णांचे हाल होत आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रूग्णांचा त्रास कमी होईल असे वाटत होते. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाने उलट रूग्णांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)

कंत्राटदारांच्या पैशाचा लोच्या कायम
सिटीस्कॅन मशीन सुरळीत चालावी याचे कंत्राट मे.सिमेन्स लिमिटेड मुंबई यांना देण्यात आले होते. परंतु त्यांचे ९ लखा ८८ हजार ३६९ रूपये न दिल्यामुळे ती मशीन दुरूस्त करण्यासाठी कंपनीचे लोक आले नाही. नियमित तज्ज्ञ नसल्यामुळे सिटीस्कॅन चालविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली. परंतु निधी अभावी त्यांना मानधन न दिल्यामुळे या सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याचेही बोलले जाते. सिटीस्कॅन मशीन बंद असल्याचे फलक लावून अधिकारी शांत बसले आहेत.

कारण माहीत असूनही प्रशासन ढिम्म
सिटीस्कॅन मशीन आता दुरूस्त झाली. परंतु उष्णतेमुळे या मशीनमध्ये बिघाड आला. उष्णतेमुळे या मशीनमध्ये बिघाड आला. एयरकुल्डची गरज आहे. तेथील एसीही खराब आहे. सव्वावर्षापासून गरीब रूग्णांना सिटीस्कॅन मशीन बंद असल्याचे सेवा मिळत नाही. आरोग्य मंत्र्याच्या सूचनेनंतर दीड महिन्यासाठी ही सिटीस्कॅन मशीन सुरू झाली होती. परंतु नंतर १८ आॅगस्ट २०१६ पासून ही मशीन कायमची बंद आहे.

 

Web Title: Even after nine reminders, the 'CISCAN' machine was locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.