सुसज्ज आरोग्य केंद्र होणार
By Admin | Updated: February 28, 2017 01:04 IST2017-02-28T01:04:06+5:302017-02-28T01:04:06+5:30
मानवाला मुलभूत गरजा पार पाडत असताना आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी ग्रामीण भागात चांगले डॉक्टर्स यावेत, ...

सुसज्ज आरोग्य केंद्र होणार
पालकमंत्र्यांची ग्वाही : प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचे भूमिपूजन
तिरोडा : मानवाला मुलभूत गरजा पार पाडत असताना आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी ग्रामीण भागात चांगले डॉक्टर्स यावेत, आरोग्याच्या सोई व्हाव्यात यासाठी या परिसरात पाच कोटी रुपयांची सुसज्ज इमारत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तयार होत आहे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तालुक्यातील ग्राम बेरडीपार (काचेवानी) येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. प्रमुख पाहुणे म्हणू भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, माजी आमदार भजनदास वैद्य, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सदस्य रजनी कुंभारे, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, पं.स.सदस्य पवन पटले, रमणीक सोयाम, बंडू सोनवाने, शाम बचवानी, डॉ. चिंतामन रहांगडाले, डॉ. वसंत भगत, सरपंच जोत्सना टेंभेकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना बडोले यांनी, अदानीने स्थानिक बेरोजगारी कमी झाली नाही. धापेवाडा योजनेअंतर्गत खळबंदा तलावात पाणी पडणार त्यामुळे सिंचन क्षमता वाढेल व शेतकरी सुखी होतील. सर्वांना घरे यासाठी शासन पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना राबवित आहे तर सगळीकडे सुंदर रस्ते यासाठी पंतप्रधान रस्ता योजना, मुख्यमंत्री रस्ता योजना राबवित आहे. ओबीसींसाठी क्रिमिलीअरची अट साडेचार लाखांवरुन सहा लाख करण्यात आली असल्याचे सांगीतले.
तर त्यांनी याप्रसंगी तहसीलदारांना लवकरच समाधान शिबिराचे आयोजन करुन शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी. शासनाच्या ६० ते ७० योजना असून त्याचा लाभ जनतेला अविलंब मिळाला पाहिजे. त्यासाठी कार्यालयाला चकरा माराव्या लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही दिल्या. आमदार रहांगडाले यांनी, आमची सत्ता केंद्र, राज्य व जिल्हा परिषदेत असून विकासासाठी निधी आम्हीच खेचून आणू शकतो. विकासकामासाठी निधीची कमी पडू देणार नाही. या क्षेत्रात रस्त्यांची दुर्दशा झाली असून हे रस्ते दुरुस्तीसाठी जि.प. उपाध्यक्षांनी या रस्त्यांची दुरुस्तीसाठी नियोजन करावे व पालकमंत्र्यांनी यासाठी निधीही द्यावा असी मागणी केली.
भाजपा जिल्हाध्यक्ष पटले यांनी, विकास आम्हीच करणार आहोत. यासाठी थोडा वेळ लागेल. करिता धीर धरावा असे सांगितले. संचालन तालुका वैद्यकीय अधिकारी टेंभुर्णे यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी शाम निमगडे यांनी मांडले. आभार सरपंच जोत्सना टेंभेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक व आरोग्य सेविकांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)