शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण व प्रदूषण विषयावर प्रदर्शन

By admin | Updated: October 18, 2014 23:28 IST

येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

गोंदिया : येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपवनसंरक्षक जे.एस. रामगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार, गृहविज्ञान विभागाच्या नागपूर विद्यापिठाच्या तसेच गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. माधुरी नासरे, एन.एस.एस. कार्यकारी अधिकारी प्रा. निता खांडेकर उपस्थित होते. यावेळी रामगावकर यांनी, पर्यावरण आणि वन्यजीव यांचा संबंध, निसर्गजीवन चक्रासाठी पर्यावरणाचे आणि वन्यजीवांचे महत्व, प्रदुषणाचे दुष्परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व विषयांवर प्रकाश घातला. यानंतर विद्यार्थिनींशी चर्चा करून प्रदर्शनातील प्रत्येक चार्ट आणि पोस्टर विषयी त्यांची मते जाणून घेतली.प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांनी, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या विषयावर प्रकाश टाकला. गृहविज्ञान विभागाच्या नागपूर विद्यापिठाच्या तसेच गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. नासरे यांनी, प्रदर्शनाच्या आयोजनसाठी विद्यार्थिनींचे कौतुक केले. या प्रदर्शनाचे आयोजन एन.एस.एस. कार्यकारी अधिकारी प्रा. निता खांडेकर यांनी केले होते. प्रदर्शनाला कला शाखा प्रमुख डॉ. राजश्री धामोरीकर, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख गोकुला ढोके, प्रा. अलका पाटील, प्रा. जे.डी. फुंडे, प्रा. ईश्वरी खटवानी यांनी भेट दिली. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेविका आशा गुप्ता, काजल पारधी, सबिया अहमद, निशाद पठाण, अश्विनी दमाहे, रिता बरईकर, चुटे, अमावस्या गोलांगे, चंद्रकला मानकर, भाग्यश्री नागपुरे, श्वेता बिसेन, फरहीन सैस्यद यांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)