पर्यावरण व प्रदूषण विषयावर प्रदर्शन
By Admin | Updated: October 18, 2014 23:28 IST2014-10-18T23:28:28+5:302014-10-18T23:28:28+5:30
येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरण व प्रदूषण विषयावर प्रदर्शन
गोंदिया : येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन उपवनसंरक्षक जे.एस. रामगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार, गृहविज्ञान विभागाच्या नागपूर विद्यापिठाच्या तसेच गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. माधुरी नासरे, एन.एस.एस. कार्यकारी अधिकारी प्रा. निता खांडेकर उपस्थित होते. यावेळी रामगावकर यांनी, पर्यावरण आणि वन्यजीव यांचा संबंध, निसर्गजीवन चक्रासाठी पर्यावरणाचे आणि वन्यजीवांचे महत्व, प्रदुषणाचे दुष्परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व विषयांवर प्रकाश घातला. यानंतर विद्यार्थिनींशी चर्चा करून प्रदर्शनातील प्रत्येक चार्ट आणि पोस्टर विषयी त्यांची मते जाणून घेतली.
प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांनी, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या विषयावर प्रकाश टाकला. गृहविज्ञान विभागाच्या नागपूर विद्यापिठाच्या तसेच गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ. नासरे यांनी, प्रदर्शनाच्या आयोजनसाठी विद्यार्थिनींचे कौतुक केले. या प्रदर्शनाचे आयोजन एन.एस.एस. कार्यकारी अधिकारी प्रा. निता खांडेकर यांनी केले होते. प्रदर्शनाला कला शाखा प्रमुख डॉ. राजश्री धामोरीकर, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख गोकुला ढोके, प्रा. अलका पाटील, प्रा. जे.डी. फुंडे, प्रा. ईश्वरी खटवानी यांनी भेट दिली.
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेविका आशा गुप्ता, काजल पारधी, सबिया अहमद, निशाद पठाण, अश्विनी दमाहे, रिता बरईकर, चुटे, अमावस्या गोलांगे, चंद्रकला मानकर, भाग्यश्री नागपुरे, श्वेता बिसेन, फरहीन सैस्यद यांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)