झाडे कुणबी समाजाचा महिला मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:49 IST2021-02-05T07:49:40+5:302021-02-05T07:49:40+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून शीला डोये, संयोजक कुंदा दोनोडे, सरोज फुंडे उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते तुकाराम महाराज व गजानन महाराजांच्या ...

झाडे कुणबी समाजाचा महिला मेळावा उत्साहात
प्रमुख पाहुणे म्हणून शीला डोये, संयोजक कुंदा दोनोडे, सरोज फुंडे उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते तुकाराम महाराज व गजानन महाराजांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी फुंडे यांनी, महिलांवर वाढलेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करीत महिला सक्षमीकरणावर जनजागृतीपर विचार मांडले. उपस्थित अन्य पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून आर्किटेक्ट परीक्षेत नागपूर विद्यापीठात गुणवंत श्रेणीत आलेल्या जयश्री घनश्याम थेर या विद्यार्थिनीचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले, तसेच लहान मुलांच्या लूट, नववधुंचा तिळवा करण्यात आला. शिवाय लहान मुलांचे विविध खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील महिलांसह १०० पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती. संचालन बहेकार यांनी केले. मेळाव्यासाठी मीना पाथोडे, भूमिका हुकरे, सुनंदा शेंडे, उषा येटरे, चारुशीला भंडारकर, दीप्ती तवाडे, अनुसया पाथोडे यांनी सहकार्य केले.