जैवविविधता राबवून समृद्ध शेती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:15 IST2017-09-25T00:15:12+5:302017-09-25T00:15:24+5:30
जवळील ग्राम खैरी येथील धान उत्पादक प्रकल्पाला अधीक्षक कृषी अधिकारी यांनी भेट दिली. मंदा गावळकर यांनी लावलेल्या प्रकल्पाची दखल घेताना प्रत्यक्ष शेतावर जाऊन ...

जैवविविधता राबवून समृद्ध शेती करा
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : जवळील ग्राम खैरी येथील धान उत्पादक प्रकल्पाला अधीक्षक कृषी अधिकारी यांनी भेट दिली. मंदा गावळकर यांनी लावलेल्या प्रकल्पाची दखल घेताना प्रत्यक्ष शेतावर जाऊन जैवविविधता राबवा आणि शेतीला समृद्ध करा असा सल्ला अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी दिला.
प्रसंगी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, ग्रामीण युवा प्रागतीक मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजीव गजभिये, पृथ्वीराज शेंडे, अरविंद धारगावे, सागर बागळे, गिरीधारी बन्सोड आदी मान्यवरांनी भेट दिली.
याप्रसंगी मंदा गावळकर यांनी दाखविण्यासाठी धानांची प्रदर्शनी लावली ते पाहिले नंतर धानाची पाहणी केली. धानाची फीटमुळे, पारंपरीक १२ जाती धानाची उंची पाहणी, बांधीचे निरीक्षण केले. त्यावेळी शेतमळ्याचे निरीक्षक करुन धानाच्या गुणधर्मावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. काही लाभदायक विशेष उपाययोजना सांगितल्या. तसेच त्यांनी राण फळे, रान भाजी आणि मुलकी धानापासून तयार करण्यात आलेले पदार्थ त्यांना चव पाहण्यासाठी खाऊ घातले. तसेच बरेच प्रकार तपासून पाहण्यात आली. वेळोवेळी ज्या काही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या प्रकल्पाच्या विकासासाठी मंदा गावळकर, देवेंद्र राऊत, केशव धावळकर आणि सुशीला महिला गट तसेच गावकरी, शेतकरी बंधू सहकार्य करीत आहेत.