शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

अखेर ‘त्या’ दोन शेतकऱ्यांचा दंड माफ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

गोेरेगाव येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील एका वार्डात कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान याच भागातील दोन शेतकरी त्यांचे ट्रॅक्टरमधील धान पावसामुळे भिजू नये यासाठी ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. मात्र नगर पंचायतने नियमाचे उल्लंघन केले म्हणून या दोन शेतकऱ्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारला. तसेच त्यांना नोटीस बजावून दंडाची रक्कम चौवीस तासात भरण्याचे निर्देश दिले होते.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची दखल : शेतकऱ्यांनी मानले लोकमतचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील दोन शेतकऱ्यावर नगर पंचायतने ठोठावलेला प्रत्येकी पाच हजाराचा दंड लोकमत ने शुक्रवारच्या (दि.५) अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच तो माफ करण्याचा निर्णय नगर पंचायतने घेतला. दरम्यान या प्रकारावरुन आ.विजय रहांगडाले यांनी सुध्दा नगर पंचायतच्या अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सुध्दा शुक्रवारी सकाळी गोरेगाव येथे पोहचत या प्रकारची चौकशी करुन आढावा घेतला.गोेरेगाव येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरातील एका वार्डात कंटेन्मेंट झोन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान याच भागातील दोन शेतकरी त्यांचे ट्रॅक्टरमधील धान पावसामुळे भिजू नये यासाठी ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. मात्र नगर पंचायतने नियमाचे उल्लंघन केले म्हणून या दोन शेतकऱ्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारला. तसेच त्यांना नोटीस बजावून दंडाची रक्कम चौवीस तासात भरण्याचे निर्देश दिले होते. नगर पंचायतच्या या कायवाईमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्याप्त होता. लोकमतने शेतकऱ्यांवरील कारवाईचा मुद्दा लावून धरला तसेच शुक्रवारच्या (दि.५) अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले. यामुळे नगर पंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत आ. रहांगडाले आणि जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी गोरेगाव पोहचत या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच नगर पंचायतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत शेतकऱ्यांवर कुठल्या आधारावर दंड आकारला याची विचारणा केली. यावर ते निरुत्तरीत झाले. तसेच शेतकऱ्यांवर आकारलेला दंड रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आकारलेला दंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष आशिष बारेवार, मुख्याधिकारी हर्षिला राणे, उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, नगरसेवक हिरालाल रहांगडाले उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांसह गोरेगाव येथील कंटेन्मेंट झोन आणि बफर झोनची पाहणी करुन माहिती घेतली. तसेच या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नगर पंचायतकडून सोयी सुविधा पुरविल्या जात आहे किंवा नाही याची सुध्दा त्यांनी या वेळी चाचपणी केली.नगर पंचायत दंडाची कारवाई केलेल्या ओमप्रकाश ठाकूर व भुवन ठाकूर या दोन शेतकऱ्यांसह इतर शेतकरी आणि कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी त्यांची समस्या लावून धरल्याबद्दल लोकमतचे आभार मानले.

टॅग्स :Farmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या