वाचन संस्कृतीमुळे बौद्धिक विकासाला चालना- धकाते

By Admin | Updated: March 29, 2015 01:40 IST2015-03-29T01:40:26+5:302015-03-29T01:40:26+5:30

आजच्या इंटरनेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. पुस्तके व ग्रंथाचे महत्व आजही कायम आहे.

Encourage intellectual development due to reading culture | वाचन संस्कृतीमुळे बौद्धिक विकासाला चालना- धकाते

वाचन संस्कृतीमुळे बौद्धिक विकासाला चालना- धकाते

गोंदिया : आजच्या इंटरनेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. पुस्तके व ग्रंथाचे महत्व आजही कायम आहे. वाचन संस्कृतिमुळे बौद्धिक विकासाला चालना मिळते, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतीमंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात गोंदिया ग्रंथोत्सव २०१५ चा समारोप २५ मार्च रोजी करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. धकाते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक विवेक लखोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर, अधिकारी- कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष दुलीचंद बुद्धे यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना लखोटे म्हणाले, सध्याचा काळ हा मोबाईल, इंटरनेटचा आहे. त्यामुळे लोक वाचनापासून दूर जात आहे. पुर्वी वाचनालयातून वाचनाची आवड पुर्ण करण्यात येत होती. परंतू वाचनाची आवड असणारा व्यक्ती एकटी कधीच नसते. ग्रंथ व पुस्तके त्याची मित्रं असतात. विविध मुद्रीत माध्यमाने आपली जागा कायम ठेवली आहे. वाचनामुळे विचारात प्रगल्भता निर्माण होते. वाचनाची गोडी कायम ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन माहिती सहायक पल्लवी धारव यांनी, प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आणि आभार शारदा वाचनालयाचे ग्रंथपाल शिव शर्मा यांनी मानले. कार्यक्रमाला युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Encourage intellectual development due to reading culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.