चिंच फोडण्याच्या व्यवसायातून महिलांना मिळतोय रोजगार

By Admin | Updated: May 10, 2014 00:22 IST2014-05-10T00:22:52+5:302014-05-10T00:22:52+5:30

ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिंचचा व्यवसाय जोरात चालत असल्याने शाळकरी मुली तसेच महिलांना रोजगार मिळत आहे.

Employment from women through tinkering business | चिंच फोडण्याच्या व्यवसायातून महिलांना मिळतोय रोजगार

चिंच फोडण्याच्या व्यवसायातून महिलांना मिळतोय रोजगार

 साखरीटोला : ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिंचचा व्यवसाय जोरात चालत असल्याने शाळकरी मुली तसेच महिलांना रोजगार मिळत आहे. चिंच व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढला आहे. सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला परिसरात मोठ्या प्रमाणात चिंचचा व्यवसाय सुरू आहे. ्र साखरीटोल्याचे शामलाल दोनोडे यांनी या व्यवसायात १५ ते २० महिला व शाळकरी मुलींना रोजगार मिळवून दिला आहे. तोंडाला पाणी सोडणारी चिंच ही सामान्य वस्तू वाटत असली तरी तिच्या उपयोगीतेमुळे चिंचचा व्यवसाय वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. दक्षिण भारतात चिंचेची मागणी अधिक असल्याने ग्रामीण भागातून तिचे उत्पादन वाढू लागले आहे. गावखेड्यामध्ये सहज उपलब्ध चिंचच्या एका झाडापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेषत: मार्च, एप्रिल, मे या महिन्यात चिंचचे उत्पादन केले जाते. शामलाल दोनोडे यांनी काही शेतकर्‍यांचे चिंचचे झाड खरेदी करून चिंचचा व्यवसाय सुरू केला. चिंच फोडण्यासाठी महिलांना व काही शाळकरी मुलींना कामावर ठेवले. चिंच फोडण्याचे कार्य किमान दीड महिने चालते. एका किलो मागे ६ ते ८ रुपये किलो मजूरी मिळते. जर एका दिवशी एक महिला १० किलो चिंच फोडण्याचे कार्य करीत असेल तर ८० रुपये मजूरी मिळते. चिंच फोडणे सोपे कार्य असल्याने सुट्टीच्या दिवसात शाळकरी मुलीसुध्दा एक ते दीड महिने मजूरी मिळवून आपल्या शिक्षणासाठी हातभार लावतात. त्यामुळे सदर व्यवसाय हा महिलांसाठी फायदेकारक माणला जात आहे. एका वर्षात कमीत कमी एक हजार पोते चिंचचे उत्पादन घेतले जात असल्याचे शामलाल दोनोडे यांनी सांगितले. गावखेड्यातील हा व्यवसाय लहान वाटत असला तरी काही काळानंतर हाच व्यवसाय मोठा रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. कारण लाखो रुपयाची उलाढाल या व्यवसायातून होत असून चिंच जरी आंबट असली तरी व्यवसाय मात्र लाखो रुपये मिळत असल्याने गोड वाटत आहे. (वार्ताहर)


Web Title: Employment from women through tinkering business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.