पर्यटन विकासातून रोजगाराला वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:23 IST2018-09-27T00:22:10+5:302018-09-27T00:23:49+5:30
तालुक्यात पर्यटनातून अपार रोजगार संधी सालेकसा तहसील महाराष्टÑ राज्याच्या टोकावर व छत्तीसगड मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत लागलेला निसर्ग सौंदर्य व जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला निसर्गांनी जे दिले ते अपार दिले आहे.

पर्यटन विकासातून रोजगाराला वाव
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यात पर्यटनातून अपार रोजगार संधी सालेकसा तहसील महाराष्ट्र राज्याच्या टोकावर व छत्तीसगड मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत लागलेला निसर्ग सौंदर्य व जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला निसर्गांनी जे दिले ते अपार दिले आहे. त्याुळे या निसर्गाने वरदान दिलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक लोकांना रोजगाराच्या अपार संधी प्राप्त होऊ शकतात.
जंगलव्याप्त व शेती व्यासाय करणाऱ्या लोकांची संख्या या तालुक्यात आहे. तसेच तालुक्यातील युवकांना रोजगाराकरिता उद्योग किंवा लघू उद्योग पण उपलब्ध नाही तसेच शेत मालावर प्रक्रिया करुन वस्तू निर्मिती उद्योग उपलब्ध नाहीत. त्यामुळे तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी फारच कमी आहेत. सध्या परिस्थितीत निसर्गाने जे या तालुक्याला दिले आहे त्याच्या भरवश्यावर या तालुक्यातील युवकांना अपार रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. व हे तालुक्यातील एका पर्यटन क्षेत्रांनी सिद्ध सुद्धा केले. सालेकसा तालुका मुख्यालयापासून अगदी १२ किमी लांब असलेल्या इंग्रज काळातील हाजराफॉल हे आजघडीला त्या हाजराफॉल नजीक नवाटोला गावताील जवळपास २०० च्यावर युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहे. नवाटोला वन वनव्यवस्थापन समिती व वनविभाग गोंदिया सालेकसा यांच्या संयुक्त प्रयत्नातून हॉजराफॉल क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. ज्यामुळे आज या पर्यटन क्षेत्रात पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळते. तसेच इतर ऋतूमध्ये सुद्धा आज जिल्ह्यातील पर्यटकासोबतच संपूर्ण राज्यातील तसेच सीमावर्ती राज्य छत्तीसगड मध्यप्रदेश या राज्यातील पर्यटकासाठी स्पेश हॉलीडे स्पॉट म्हणून नावारुपास येत आहे. ज्यामुळे या क्षेत्रातील युवकाकरिता व्यवसायाचे माध्यम बनत चालले आहे. या क्षेत्राच्या आतमध्ये तसेच बाहेर सुद्धा युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे.
कचरागडच्या विकासाची गरज
सालेकसा तालुक्यात आश्यिा खंडातील गोंडी धर्माचे आराध्यस्थळ ‘काशी’ कचारगड सुद्धा प्रचंड मोठे पर्यटनस्थळ आहे. जिथे माद्य महिन्यात मोठी यात्रा भरते. यात लाखोंच्या संख्येत पर्यटक येतात व याकाळात येतात. येथे मोठी बाजारपेठ निर्माण होते. जिथे शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध होत असतो. परंतु इतर वेळी सुद्धा या क्षेत्राचा विकास पूर्णपणे झाल्यानंतर पर्यटन वाढण्याची संधी मिळेल ज्यामुळे सुद्धा या क्षेत्राच्या आसपास राहणाºया लोकांना प्रचंड रोजगार संधी उपलब्ध होऊ शकते.
तालुक्यावर निसर्गाची कृपा
निसर्गाने सालेकसा तालुक्याला अनेक निसर्ग पर्यटन क्षेत्र दिले आहेत. ज्यात अंबागडसारखे अनेक स्थळ आहेत. जे पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित आहेत. ज्याचा विकास झाल्यास पर्यटन व्यवसायात वाढ होऊन रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात. पुजारीटोला, मानागड, मानपुही यासारखे पाणी साठवण धरणाचा योग्य विकास झाल्यास या धरणांना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे सुद्धा या धरणाच्या आसपास असलेल्या युवकांना प्रचंड रोजगार संधी उपलब्ध आहेत. तसेच त्याच तालुक्यात असलेली धार्मिक मंदिरे ज्यात गडमाता मंदिर, अर्धनारेश्वरालय, त्रिलोकेश्वरधाम, पोगेंझरा आश्रम, डोमाटोला शिवमंदिर अशा अनेक धार्र्मिक स्थळाचा योग्य विकास झाल्यास हे स्थळ सुद्धा तहसीलच्या पर्यटन व्यवसायाला चालना देऊन तालुक्यातील अनेक युवकांना रोजगार संधी उपलब्ध करुन देऊ शकतात.