२९ व ३० रोजी रोजगार मेळावा
By Admin | Updated: April 28, 2015 23:55 IST2015-04-28T23:55:32+5:302015-04-28T23:55:32+5:30
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २९ व ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक ...

२९ व ३० रोजी रोजगार मेळावा
गोंदिया : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २९ व ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोरेगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात उपस्थित उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. करिअर कौसेलिंगकरिता इच्छुक उमेदवारांची नोंदणी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक डी.एस. भोयर यांनी कळविले आहे.
यावेळी हैद्राबाद येथील रिजनल ट्रेनिंग सेंटर यांच्याकडे ६०० सुरक्षा रक्षकांची पदे अधिसूचित करण्यात आली आहे. या ट्रेनिंग सेंटरचे अधिकारी सुरक्षा रक्षक पदाच्या मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहे. पुरुष उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे, त्याच्या छायाप्रती, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नोंदणी कार्ड व स्वत:चे अलिकडे काढलेले पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत घेऊन हजर राहायचे आहे असे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाने कळविले. (जिल्हा प्रतिनिधी)